Bollywood Star Kids Debut: बॉलीवूड चित्रपटांमधून एकेकाळी गाजलेल्या भूमिका केलेली अभिनेत्री रवीना टंडन आणि निर्माते अनिल थडानी यांची ही कन्या आहे. एका थ्रिलर चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत आहेत. या चित्रपटात अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण हा देखील पदार्पण करत असल्याने या चित्रपटाबद्दल आत्तापासूनच चर्चा सुरू झालेल्या आहेत. अभिनेत्री रविना टंडन ने एकेकाळी बॉलीवूड गाजवलेले असल्याने स्वाभाविकपणे तिची मुलगी राशाकडूनही चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र सध्याच्या काळात स्टार किड्स ना स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे आव्हानात्मक ठरू लागले आहे. त्यामुळे राशा थडानीचे करियर कशा पद्धतीने वळण घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. इब्राहिम अली खान – अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा असलेला इब्राहिम अली खान हा सरजमीन या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केओज इराणी यांनी केले आहे. या चित्रपटात इब्राहिम हा मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याचबरोबर बॉलीवूड मधील अनुभवी अभिनेत्री काजोलची देखील या चित्रपटात भूमिका आहे. इब्राहिम अली खान हा तंतोतंत त्याच्या वडिलांसारखा देखणा दिसत असल्यामुळे तो नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेतो. त्यामुळेच त्याच्या पदार्पणाबद्दल चित्रपट रसिकांच्या मनात उत्सुकता आहे. अमन देवगण – बॉलीवुड सुपरस्टार अजय देवगणचा पुतण्या असलेला अमन देवगण देखील पुढील वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. अर्थात या पूर्वी सांगितल्याप्रमाणे तो अभिनेत्री रविना टंडनची कन्या राशा थडानी बरोबर काम करणार आहे. आहन पांडे – अभिनेता चंकी पांडेचा पुतण्या आहन पांडे हा देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. ॲक्शन आणि एंटरटेनमेंट असलेल्या बडे मिया छोटे मिया या चित्रपटाद्वारे तो पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार हे देखील आहेत. आहान पांडे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो त्यामुळेच बॉलिवूडला त्याच्या पदार्पणाची उत्सुकता आहे. शनाया कपूर – अभिनेता संजय कपूर आणि महिप कपूर यांची कन्या असलेली शनाया ही वृषभ या चित्रपटाद्वारे पदार्पण करणार आहे. या चित्रपटात दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील आहेत. त्यामध्ये मोहनलाल यांचा समावेश आहे.