Leopard Attack : अभिनेता विक्रांत मेस्सीवर शूटिंगदरम्यान बिबट्याचा हल्ला

मुंबई : आपल्या निवृत्तीच्या पोस्टमुळे अभिनेता विक्रांत मेस्सी मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या विक्रांत शनाया कपूरसोबत ‘आँखों की गुस्ताखियां’ चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान विक्रांतवर एका बिबट्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे सेटवर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
संजय कपूरची मुलगी शनाया कपूर ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, विक्रांत आणि शनाया या चित्रपटातील काही सीन्स शूट करत होते. यादरम्यान अचानक एक बिबट्या आला आणि त्याने सेटवर हल्ला केल्याचे समजत आहे.
पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिबट्याने हल्ला केल्याने शनाया चांगलीच घाबरली आहे. शूटिंग दरम्यान बिबट्याचा हल्ला झाल्याचे ऐकून सेटवर मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे सेटवर भीतीचे वातावरण असून सगळे अलर्ट मोडवर आहेत. विक्रांतच्या अपघाताबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र कोणतेही नुकसान झाले नसल्याचे समजत आहे.





