शाहरुख खानचा लेक आर्यन ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात?’ बॅड्स ऑफ बॉलिवूड’च्या प्रीमियरमध्ये दिसली झलक

Aryan Khan Rumored Girlfriend | बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जगभरात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. यानंतर आता शाहरुख खानचा लेक आर्यन खानने देखील दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.
आर्यन खानने ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. नुकतेच मुंबईत ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सिनेमाचा प्रीमियर झाला. या प्रीमियरला बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सीरिजच्या प्रीमियर नाईटला अंबानी कुटुंब, रणबीर-आलिया, विकी कौशल, बॉबी देओल यांचे कुटुंब यांच्यासह अनेक मान्यवर दिसले. शाहरुख खानचे कुटुंबही चर्चेत राहिले. पण खरी लाइमलाइट आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडने लुटली.
शाहरुखचा लेक आर्यन खान हा सध्या ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री लॅरिसा बोनेसीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. यातच आता या शोच्या प्रीमियरमध्ये लॅरिसा बोनेसीही पोहचली होती. लॅरिसाने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता. यासोबत काळ्या रंगाच्या हाय हील्स आणि डायमंड इअररिंग्स, ब्रेसलेट परिधान करुन ग्लॅमरस लूक केला होता. लॅरिसा ब्राझिलियन मॉडेल असली तरी तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. Aryan Khan Rumored Girlfriend |
View this post on Instagram
आर्यन खानचे नाव बऱ्याच काळापासून लॅरिसा बोनेसीसोबत जोडले जात आहे. ‘देसी बॉईज’ चित्रपटातील ‘सुबह होने न दे’ या गाण्यातून लॅरिसाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय, तिने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केले आहे. लॅरिसा प्रसिद्ध गायक गुरु रंधावासोबत ‘सूरमा-सूरमा’ गाण्यातही झळकली होती. लॅरिसाने अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत काम केलं आहे. आर्यनची पहिली वेब सीरिज ‘बॅड्स ऑफ बॉलीवुड’ 18 सप्टेंबर म्हणजेच आज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.
हेही वाचा :
Pune Rural News : बकोरी रस्त्यांच्याबाबत प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे





