पुण्यातील हडपसरमध्ये खळबळजनक घटना; हात-पाय बांधून मृतदेह बॉक्समध्ये केला पॅक
Updated On:

पुणे – तरूणाचे हात – पाय बांधून बॉक्समध्ये मृतदेह पॅक करून तो बॉक्स फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमधील हिंगणे मळा कॅनॉलजवळ उघडकीस आला. तरूणाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास करण्यात येत आहे.
शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. तरूणाचे हात पाय बांधून त्याला बॉक्समध्ये पॅक करण्यात आले. त्यानंतर हा बॉक्स हिंगणे मळा कॅनॉलजवळ फेकून देण्यात आला. स्थानिकांना हा बॉक्स आढळून आल्यानंतर पोलिसांना तातडीने याची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष असल्याचे सांगण्यात आले असून हडपसर पोलीस पुढील तपास करत आहेत. ( pune murder)





