Maharashtra Politics : मोठी घडामोड..! काँग्रेसच्या बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
Maharashtra Politics : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे स्थानिक नेते आकाश गावित यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

Maharashtra Politics : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे स्थानिक नेते आकाश गावित यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आकाश गावित यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Maharashtra Politics)
आकाश गावित हे नवापूरचे काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे नवापूरच्या स्थानिक राजकारणात या घडामोडीची चर्चा सुरू झाली आहे. पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Maharashtra Politics)
भाजपच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
आकाश गावित यांनी अनेक समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. त्यांच्या प्रवेशामुळे नवापूरमध्ये भाजपच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची शक्यता पक्षाकडून व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)
नवापूर विधानसभा मतदारसंघातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिरीष नाईक काँग्रेसकडून विजयी झाले होते. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील स्थानिक नेत्याच्या पक्षबदलाकडे आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, आकाश गावित यांच्या पक्षप्रवेशानंतर नवापूर आणि नंदुरबार जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : मोठी बातमी..! शिवसेनेच्या शाखेतच शाखाप्रमुखाला बांबूने मारहाण; राज्यात खळबळ





