SCO vs AUS 1st T20 : ट्रॅव्हिस हेडची वादळी खेळी, स्कॉटलँडचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं केला नवा विश्वविक्रम….

Scotland vs Australia 1st T20 : ऑस्ट्रेलियाने तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात स्कॉटलंडचा 7 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम खेळताना यजमान स्कॉटलंडने निर्धारित 20 षटकांत 154 धावा केल्या होत्या, मात्र कांगारू संघाने 62 चेंडू शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले. अवघ्या 25 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी करणाऱ्या ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने धावांचा पाऊस पाडला. त्याच्यानंतर उरलेली कसर कर्णधार मिचेल मार्शने भरून काढली, त्याने 39 धावांची तुफानी खेळी केली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमान संघाकडून सर्वाधिक धावा जॉर्ज मुनसेने केल्या, ज्याने 28 धावा केल्या. कर्णधार रिची बेरिंग्टनने 23 आणि मॅथ्यू क्रॉसने 37 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने जेक फ्रेझर मॅकगर्कची विकेट लवकर गमावली, पण येथून मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडने चौकार आणि षटकाराचा वर्षाव करत संघाचा विजय सोपा केला. ऑस्ट्रेलियाने केवळ 58 चेंडूत 155 धावांचे लक्ष्य गाठले.
पॉवरप्लेच्या 6 षटकात 113 केल्या धावा…
डावाच्या तिसऱ्या चेंडूवर जेक फ्रेझर मॅकगर्कची विकेट पडली. यानंतर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघाची कमान सांभाळली. या दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या अवघ्या 6 षटकांत 113 धावांवर नेली. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पॉवरप्लेमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. मार्श पॉवरप्लेनंतर पुढच्याच चेंडूवर 39 धावांवर बाद झाला. औपचारिकपणे पाहिले तर मार्श आणि हेडच्या जोडीने 33 चेंडूत या 113 धावा केल्या.
T20 आंतरराष्ट्रीय मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ
ऑस्ट्रेलिया – 113 धावा (वि स्कॉटलंड, 2024)
दक्षिण आफ्रिका – 102 धावा (वि. वेस्ट इंडीज, 2023)
वेस्ट इंडिज – 98 धावा (वि श्रीलंका, 2021)
आयर्लंड – 93 धावा (वि. वेस्ट इंडिज, 2020)
A statement win from Australia in Edinburgh! #SCOvAUS
Full scorecard: https://t.co/p1Sdrxn4V2 pic.twitter.com/ok1QqABaup
— cricket.com.au (@cricketcomau) September 4, 2024
ट्रॅव्हिस हेडचे वादळ..
ट्रॅव्हिस हेडने या सामन्यात 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत तो आता मार्कस स्टॉइनिसच्या बरोबरीने पोहोचला आहे. हेडने 25 चेंडूत 80 धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून 12 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकारही आले. दुसरीकडे, मिचेल मार्शने 39 धावांची खेळी केली. त्याने आपल्या डावात केवळ 12 चेंडू खेळले, त्यापैकी 8 चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचले कारण त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले.
ऑस्ट्रेलियासाठी T20I मध्ये सर्वात जलद अर्धशतक…
ट्रॅव्हिस हेड -17 चेंडू
मार्कस स्टॉइनिस – 17 चेंडू
डेव्हिड वॉर्नर – 18 चेंडू
ग्लेन मॅक्सवेल – 18 चेंडू





