School : राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरणार; पाऊस नाही तर ‘या’ कारणासाठी बदल
School : आगामी ३० जुलैपर्यंत राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश

School : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा मोठा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामागचे कारण सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस नसून, एका शासकीय मोहिमेसाठी हा बदल करण्यात आला आहे.
राज्यात मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिक्षकांना मतदार याद्यांच्या कामासाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी शाळांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे.
यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने आगामी ३० जुलैपर्यंत राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे शाळांच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (School)
परिपत्रकात नेमकं काय? (School)
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या पत्रानुसार, बीएलओ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांच्या अध्यापनाच्या तासिका कमीत कमी ठेवण्यात याव्यात. त्यांचे वेळापत्रक सकाळी सलग तासांचे ठेवावे. तसेच ज्या शिक्षकांची ‘बीएलओ’ म्हणून नियुक्ती झालेली नाही, त्यांनी बीएलओ नियुक्त शिक्षकांच्या कामाचा अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून त्यांच्या शालेय कामात साहाय्य करावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. (School)

School : राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरणार; पाऊस नाही तर ‘या’ कारणासाठी बदल
परंतु या निर्णयावर यावर शिक्षक महासंघाचे अनिल बोरनारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रांत भरणाऱ्या शाळा ३० जुलैपर्यंत एकाच सत्रात कसे भरवले जाणार? असा सवाल त्यांनी केला आहे. ( School)
तसेच शाळा सांभाळून बीएलओचे काम करणे हा शिक्षकांचा मानसिक आणि शारीरिक छळ आहे. बीएलओ शिक्षकांना अध्यापनाचे सलग तास देण्याचे नियोजन शाळांना कसे शक्य होणार? असेही त्यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा:





