Satyajeet Tambe : “शालेय शिक्षण विभाग सर्वाधिक बदनाम”; सत्यजित तांबे यांचा हल्लाबोल
राज्यातील सर्वाधिक बदनाम विभागांमध्ये आज शालेय शिक्षण विभागाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, असा गंभीर आरोप करताना अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

Satyajeet Tambe – राज्यातील सर्वाधिक बदनाम विभागांमध्ये आज शालेय शिक्षण विभागाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, असा गंभीर आरोप करताना अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.
याबरोबरीने आपण करत असलेले आरोपांवर मंत्र्यांनी, आम्ही करत असलेले आरोप हे खरे नाहीत, असे म्हणून सभागृहाची दिशाभूल करू नये, असा इशारा देखील दिला.
विधान परिषदेत अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागावर जोरदार हल्लाबोल केला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक आणि सामान्य नागरिक वर्षानुवर्षे आपल्या प्रकरणांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. (Satyajeet Tambe)
राज्यभर आंदोलने सुरू आहेत. ऑनलाइन प्रणालीच्या नावाखाली लोकांना पुन्हा हार्ड कॉपी जमा करायला लावून हेलपाटे मारायला भाग पाडले जात आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अस्तित्वात असतानाही वेळेत निर्णय होत नाहीत. ही दिरंगाई केवळ अकार्यक्षमता नाही, तर भ्रष्ट व्यवस्थेला पोषक ठरणारी पद्धत बनली आहे.
मात्र सभागृहात मंत्र्यांकडून प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर ‘खरे नाही’ असे देण्यात येते. जर खरंच सगळेच मान्य असेल, तर मग कारवाई कुठे आहे? दोषी अधिकारी अजूनही खुर्च्यांवर का आहेत ?
जनतेला न्याय कधी मिळणार ? कबुली देणे सोपे असले तरी भ्रष्ट यंत्रणेवर हात घालण्याची हिंमत सरकार दाखवणार का? असे प्रश्न उपस्थित केले.
या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षण विभागाशी संबंधित ज्या प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे, त्या प्रकरणांचा आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.
तसेच विभागातील कोणत्याही अनियमिततेकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. संबंधित चौकशींची माहिती घेऊन आवश्यक त्या पातळीवर कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले.





