School Bus Accident : मोठी बातमी..! शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं; 10 विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर
School Bus Accident : मुसळधार पावसामुळे एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक दुर्घटना समोर आली आहे.

School Bus Accident : मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले असून, चेंबूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चेंबूरच्या 11 नंबर रोडवर धावत्या शाळेच्या बसवर अचानक मोठे झाड कोसळल्याने बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत 10 विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, एका विद्यार्थ्याच्या बसमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (School Bus Accident)
झाड कोसळल्याने बसच्या वरच्या भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. (School Bus Accident)
Alephata bus stand: एसटी प्रशासनाचा मोठा दणका! आळेफाटा बसस्थानक परिसरात ८ वाहनांवर कारवाई
अग्निशमन दल, BMC आणि पोलिसांचे बचावकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बसवर कोसळलेले झाड मोठे आणि जड असल्याने ते हटवण्यासाठी जेसीबी आणि अत्याधुनिक कटरच्या सहाय्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याला सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (School Bus Accident)
School Bus Accident : मोठी बातमी..! शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळलं; 10 विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर
जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू (School Bus Accident)
घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका दाखल करण्यात आल्या असून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. (School Bus Accident)
Alephata bus stand: एसटी प्रशासनाचा मोठा दणका! आळेफाटा बसस्थानक परिसरात ८ वाहनांवर कारवाई





