पीवायसी तर्फे चार खेळाडूंना शिष्यवृत्ती
Updated On:

पुणे -क्रिकेट महर्षी कै. प्राचार्य दि. ब. देवधर यांच्या कुटुंबीयांनी पीवायसी क्लबबरोबर क्लबमध्ये खेळणाऱ्या व या वर्षभरात चमकदार कामगिरी करणाऱ्या सुफियान सय्यद, आदित डोंगरे, वेदांत हांचे आणि साईराज चोरगे या नवोदित खेळाडूंना प्रत्येकी 25 हजार रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात आले. या खेळाडूंना भारताचे माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी पीवायसी क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, सचिव सारंग लागू, क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर तसेच देवधर कुटुंबीयांच्या वतीने रंजना बर्वे, विजय बर्वे, डॉ. दीपक आठवले, डॉ. नंदिनी आठवले, डॉ. वृषाली आठवले आणि कपिल खरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी रणजीपटू निरंजन गोडबोले यांनी केले.




