KL Rahul Record : केएल राहुलने रचला इतिहास! आयपीएलच्या इतिहासात ‘हा’ मोठा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय
KL Rahul Record : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुलने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी करत इतिहास रचला आहे.

KL Rahul 152 runs record IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात २५ एप्रिल रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर केएल राहुलने आपल्या बॅटचा असा काही तडाखा दाखवला की, आयपीएलच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे. राहुलने केवळ शतकच झळकावले नाही, तर दीडशे धावांचा टप्पा ओलांडून क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे.
केएल राहुलने रचला इतिहास –
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर केएल राहुलने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. केएल राहुलने २२६.८७ च्या स्फोटक स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ६७ चेंडूंत नाबाद १५२ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. यासह आयपीएलच्या इतिहासात १५० धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
गेल आणि मॅक्युलमच्या पंगतीत स्थान –
Tired, breathless, but firmly holding the Orange Cap! 🧡
🎥 Hear from KL Rahul as he breaks down his sensational 1️⃣5️⃣2️⃣* in the sweltering New Delhi conditions ☀️
Updates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#TATAIPL | #KhelBindaas | #DCvPBKS | @DelhiCapitals | @klrahul pic.twitter.com/BfIdkGOAzt
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
आयपीएलमध्ये १५० पेक्षा जास्त धावा करणारा राहुल हा जगातील केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी २००८ मध्ये ब्रेंडन मॅक्युलमने नाबाद १५८ आणि २०१३ मध्ये ख्रिस गेलने १७५ धावांची खेळी केली होती. आता तब्बल १३ वर्षांनंतर कोणत्याही फलंदाजाला १५० धावांचा आकडा गाठता आला असून, राहुलने हे यश मिळवून भारतीयांची मान उंचावली आहे.
अभिषेक शर्माचा विक्रम मोडीत –
In sync, In charge 🤝
One word for this record-breaking stand? 🤔👇
Updates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#TATAIPL | #KhelBindaas | #DCvPBKS pic.twitter.com/v3aSFEmOHE
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
याआधी आयपीएलमध्ये भारतीयांतर्फे सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम अभिषेक शर्माच्या (१४१ धावा, २०२५) नावावर होता. केएल राहुलने १० चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद १५२ धावा करत हा विक्रम मोडीत काढला. राहुलला नितीश राणाने (९१ धावा) खंबीर साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २२० धावांची रेकॉर्डब्रेक भागीदारी केली, ज्याच्या जोरावर दिल्लीने २० षटकांत २६४ धावांचा डोंगर उभा केला.





