समाधानकारक! देशात सलग दुसऱ्या दिवशी करोनाबाधितांच्या संख्येत घट

नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे, तर दुसरीकडे मंकीपॉक्स विषाणूही हातपाय पसरत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता एक समाधानकारक बातमी म्हणजे देशात सलग दुसऱ्या दिवशी करोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे, पण तुलनेन मृत्यूची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशात गेल्या 24 तासांत 16 हजार 866 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 20 हजार 279 नवीन करोना रुग्णांची नोंद आणि 36 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सलग आदल्या दिवसाच्या तुलनेत करोना संसर्गात घट झाली आहे. दुसऱ्या दिवशी करोना संसर्गात घट झाली आहे. रविवारी दिवसभरात 18 हजार 148 करोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
#COVID19 | India reports 16,866 fresh cases, 18,148 recoveries and 41 deaths in the last 24 hours.
Active cases 1,50,877
Daily positivity rate 7.03% pic.twitter.com/ySu2CpXnIq— ANI (@ANI) July 25, 2022
देशातील सक्रीय रुग्णांची संख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. सध्या देशात 1लाख 50 हजार 877 सक्रिय करोना रुग्ण आहेत. सध्या देशातील सक्रिय करोना रुग्णांचे प्रमाण 0.34 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.46 टक्के आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 148 रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 32 लाख 28 हजार 670 रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले आहेत.





