Satara: फेब्रुवारीत उन्हाळ्याची दाहकता
Updated On:

सातारा : फेब्रुवारीच्या मध्यातच सध्या शहरातील तापमानाचा पारा 36 अंशावर जाऊ लागला आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनंतर उन्हाचा तडाखा जाणवू लागतो, मात्र यावर्षी फेब्रुवारी सुरू झाल्यापासूनच उन्हाचा तडाखा चांगला जाणवत आहे.
सातारा शहरातील अनेक वृक्ष हे सुद्धा निष्पर्ण होऊन पानगळती झाल्यामुळे त्यातून या वर्षीच्या प्रचंड तापणाऱ्या उन्हाळ्याची दाहकता दिसून येत आहे.
दरवर्षी चैत्र महिन्यात नवी पालवी या झाडांना येते. मात्र, सध्या प्रचंड वाढलेल्या तापमानाची झळ चांगलीच जाणवत आहे. (छाया : अतुल देशपांडे)





