Satara : शिरवडे रस्त्यावरील रेल्वे गेट दुरुस्तीसाठी 2 दिवस राहणार बंद…

यशवंतनगर (प्रतिनिधी) – शिरवडे (ता. कराड) मार्गावरील रेल्वे फाटक (क्र. 94) गुरुवार (दि. 21) व शुक्रवार (दि. 22) रोजी रेल्वे रुळ आणि तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री 10 ते शुक्रवारी पहाटे 3 यादरम्यान रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसह फाटकाच्या आतील तांत्रिक दुरुस्तीसाठीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सदर फाटक बंद ठेवण्यात येणार आहे.
वाढत्या रहदारीवेळी फाटक ऐनवेळी नादुरुस्त झाल्यास रहदारीचा खोळंबा होत असतो. तसेच अवजड मालगाडयांच्या वाहतुकीमुळे रूळाखालील खडी बदलणे आवश्यक असते. या दुरूस्त्यांसाठी रेल्वेगेट बंद राहणार असल्याचे परिसरातील ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, सह्याद्री साखर कारखाना यांना नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्य मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून गैरसोय टाळण्यासाठी लगतच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन कराड कार्यालयाचे सिनीअर सेक्शन इंजिनिअर यांनी केले आहे.





