Satara News: खळखळणाऱ्या पाण्यातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव उजळेल – नितीन बानगुडे पाटील

प्रभात वृत्तसेवा
पुसेगाव – कायम दुष्काळी भाग असणाऱ्या खटाव-माणसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जिहे-कठापूर योजनेची निर्मिती केली. गेल्या काही दिवसांपूर्वी या योजनेचे पाणीपूजन लोकप्रतिनिधीनी केले. पण यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नसला तरी खळखळणाऱ्या पाण्यातून बाळासाहेबांचे नाव उजळेल, असा टोला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष , शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी लोकप्रतिनिधींना लगावला.
फडतरवाडी ता . खटाव येथे जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन व दीपमहोत्सवावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते छाया शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख शेतकरी सेना प्रताप जाधव, उपजिल्हाप्रमुख दत्ता नलवडे, तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे,
तालुका प्रमुख रमेश बोराटे, तालुकाप्रमुख संजय नांगरे, भानदास कोरडे, संघटक यशवंत जाधव, अर्जुन मोहिते शाखाप्रमुख असलम शिकलगार, उपतालुकाप्रमुख आमीन आगा, पुसेगाव शहर प्रमुख आकाश जाधव, महिला आघाडी तालुकाप्रमुख अनिता काळे , सत्वशीला जाधव, मुगुटराव कदम उपस्थित होते.
नितीन बानुगडे पाटील यांनी जिहे-कठापूर योजनेचा इतिहास सांगितला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान किती आहे हे सांगितले.जरी लोकप्रतिनिधींनी बाळासाहेब ठाकरे यांचा नावाचा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी उल्लेख केला नसला तरी खळखळणाऱ्या या पाण्यातून बाळासाहेबांचे नाव उजळेल असे म्हणाले.
युतीच्या काळात योजना झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी या योजनेसाठी विशेष लक्ष देऊन या योजनेच्या काळात भरून निधी टाकला आहे. योजना 80 टक्के काम पूर्णतः गेले व सरकार गेले . पुन्हा सरकार आले. मुख्यमंत्री कार्यलयात उद्धव ठाकरे यांनी या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळवून दिली व केंद्राकडून मोठा निधी या योजनेस आणला.
आंदोलनकर्त्यांचा मातोश्रीवर सन्मान
संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील यांनी या कार्यक्रमावेळी आजपर्यंत या आंदोलनात जे शिवसैनिक सहभागी झाले. या आंदोलनादरम्यान केसेस, तुरुंगवास भोगला या सर्वांचा सन्मान उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख अनिता काळे यांनी या आंदोलनादरम्यान वडूज पोलीस स्टेशन येथे प्रताप जाधव यांच्या समवेत पाच दिवस तुरुंगवास भोगला, त्यायाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.





