Aditya Thackeray – “आजा, तुझा आशीर्वाद…” : बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आदित्य ठाकरेंची भावनिक पोस्ट
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून आदित्य यांनी आजोबांसोबच्या लहाणपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे

Aditya Thackeray Post : हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज २३ जानेवारी १०० वी जयंती आहे. या दिवसाचे औचित्य साधत राजकीय, सामाजिक यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर सोशल मीडियावरून पोस्ट लिहित बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करत आहेत.
या निमित्ताने शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून आदित्य यांनी आजोबांसोबच्या लहाणपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
“आजा, तुझा आशीर्वाद हिच माझी ताकद, हिच माझी ऊर्जा!” अशी भावनिक पोस्ट आदित्य ठाकरे यांनी शेअर केली आहे. या पोस्टसोबतच आदित्य यांनी ते स्वतः लहान असतानाचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा एक सुंदर फोटो देखील शेअर केला आहे.
आजा,
तुझा आशीर्वाद
हिच माझी ताकद,
हिच माझी ऊर्जा! pic.twitter.com/KYyhJYXRGm— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 22, 2026
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आज २३ जानेवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या दिवसाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा देत लेखाच्या स्वरुपातून आठवणी सांगितल्या आहेत.
राज ठाकरेंनी सांगितली आठवण
खरंतर राज ठाकरे यांच्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची छुबी दिसते, असे अनेकजण म्हणतात. दैनिक सामनासाठी राज ठाकरे यांनी विशेष लेख लिहिला आहे. यामध्ये माझे काका…असं म्हणत राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.
बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे, ज्यामध्ये अग्रलेखापेक्षा जास्त ताकद होती. त्यांच्या या कलेला जागतिक मान्यता मिळाली, पण आपल्या देशात त्यांची योग्य कदर कधी झालीच नाही. खरं तर, ‘बाळासाहेब ठाकरे’ हा विद्यापीठांमधून शिकवण्याचा विषय आहे, पण आपल्याकडे तशी मानसिकताच धोरणकर्त्यांमध्ये नाही.
२००५ साली मी पक्ष सोडला आणि साल २००६…जानेवारी महिन्यात मी राज्यव्यापी दौन्यावर निघालो प्रवासात असताना मोबाईल वाजला… मी फोन घेतला, पलीकडून आवाज आला, ‘बरा आहेस ना रे…?’ बाळासाहेब काळजीच्या स्वरात विचारत होते. मी हो म्हटलं. ‘कुठे लागलं नाही ना?’ लगेच पुढचा प्रश्न आला.
खरं तर, आमच्या गाडीला ट्रकची धडक बसणार होती, पण तसं झालं नाही. आम्ही बचावलो, सुखरूप होतो, पण बातमी ‘मातोश्री’ पर्यंत गेली होती. म्हणूनच काकाच्या आवाजात काळजी होती, अशी एक आठवण राज ठाकरे यांनी शेअर केली आहे.
हेही वाचा : Homebound :‘होमबाऊंड’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर; करण जोहर म्हणाला, “भावूक आहे, पण…”





