Uddhav Thackeray Action Mode : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मरगळ आली असतानाच, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Action Mode) पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पक्षातील खासदारांनी आठ दिवसांपूर्वीच प्रचारात उद्धव आणि आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray Action Mode) उतरले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे देखील संपूर्ण राज्यभरातील राजकीय परिस्थिती आणि पक्ष संघटनेचा सविस्तर आढावा घेणार आहेत. यासाठी १ आणि २ एप्रिल रोजी मुंबईत जिल्हा संपर्कप्रमुखांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. Uddhav Thackeray Action Mode सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत १ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाडा विभागातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. तर २ एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक होणार आहे. दोन्ही दिवशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव आणि आदित्य ठाकरे दोघेही एकत्रितपणे राज्यभरातील पक्ष संघटनेचा आणि राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहेत. पक्षातील मरगळ दूर करून शिवसैनिकांना पुन्हा एकदा जोश आणि उत्साह देण्याचा प्रयत्न या बैठकीतून होणार असल्याचे मानले जात आहे. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष जबाबदारी दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी मुंबईतील शिवसेना नगरसेवकांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईसह राज्यातील पहिल्या टर्ममधील काही निवडक नगरसेवकांना देखील या कार्यक्रमांच्या निरीक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम घेण्यात येणार असून, यासाठी पक्षाने सखोल तयारी सुरू केली आहे. बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष स्थानिक निवडणुकीतील अपेक्षित यश न मिळाल्याने निर्माण झालेली नाराजी आणि पक्षातील उदासीनता दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक (Uddhav Thackeray Action Mode) बोलावली असून, यातून पक्ष संघटनेची पुनर्रचना आणि भविष्यातील रणनीती ठरवली जाणार आहे. दोन दिवसांच्या या महत्वाच्या बैठकीकडे शिवसेना ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. संपर्क प्रमुखांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे : ठाणे जिल्हा – धर्मेंद्र काळे, नाशिक – सुहास वाडकर, नागपूर – किरण तावडे, वर्धा – सचिन पडवळ, सचिन पाटील – पालघर, निशिकांत शिंदे – चंद्रपूर, तुळशीराम शिंदे – धुळे, जितेंद्र वळवी – नंदुरबार, प्रमोद सावंत – जळगाव, सदा परब, चंगेज मुलतानी- अहिल्यानगर, चिंतामणी निवाटे – जालना, दीपक सावंत – हिंगोली, विश्वास शिंदे – बीड, सुनील मोरे – नांदेड, रमाकांत रहाटे – अमरावती, अनिल कदम – अकोला, हरी शास्त्री – वाशीम, जोसेफ कोळी – बुलढाणा, राज मुल्ला – भंडारा, शशिकांत झोरे – गोंदिया, विजय भनगे – यवतमाळ, विठ्ठल लोकरे – गडचिरोली, अंकित प्रभू – रायगड, गीतेश राऊत – रत्नागिरी, सुरेश पाटील – सिंधुदुर्ग, सोमनाथ सांगळे – पुणे, सत्यवान उभे – सातारा, स्वप्नील कुंजीर – सांगली, कैलास पाठक – सोलापूर, उदय दळवी – कोल्हापूर, आशिष चेंबूरकर – छत्रपती संभाजीनगर, राजू पाटील – परभणी, सुनील पाटील – धाराशिव, मुकेश साळुंके – लातूर.