Satara News : कोयना नदीपात्रात उद्या अतिरिक्त पाणी सोडणार !
Updated On:

सातारा – सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे उद्या मंगळवार दि. ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अतिरिक्त १००० क्युसेक पाणी विसर्ग सोडण्यात येणार आहे.
कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीमध्ये एकूण ३१०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.





