Satara News : धक्कादायक! साताऱ्यातील वाय. सी. कॉलेजच्या वसतिगृहातून उडी मारून 19 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या
सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण (वाय. सी.) सायन्स कॉलेजच्या वसतिगृहात (Satara News) बुधवारी सायंकाळी एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

Satara News : सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण (वाय. सी.) सायन्स कॉलेजच्या वसतिगृहात (Satara News) बुधवारी सायंकाळी एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वाय. सी. कॉलेजसह वसतिगृह परिसरात एकच खळबळ उडाली.
मृत विद्यार्थिनी जावळी तालुक्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तिने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याचा सातारा (Satara News) शहर पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला असून वसतिगृहातील संबंधित विद्यार्थिनी व कॉलेज प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच जखमी विद्यार्थिनीला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांनी रात्री जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थांची अचानक मोठी गर्दी झाल्याने रुग्णालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा तसेच वसतिगृहातील (Satara News) मानसिक आरोग्य आणि सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या परिस्थितीत उचलले, याचा सखोल तपास होण्याची मागणी होत आहे.






