Satara Crime | कृष्णा नदीपात्रात आढळला अनोळखी मृतदेह
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
सातारा – क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे रामेश्वर मंदिराच्या वाकड घाटालगत गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास 45 ते 50 वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. चेहरा गोल, रंग निमगोरा व उंची पाच फूट सहा इंच, गळ्यात वारकरी माळ, उजव्या हातात स्टीलचे कडे असून, अंगात फिकट गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट असलेला हा मृतदेह कृष्णा नदीपात्रात आढळला आहे. याबाबत कोणाला माहिती असल्यास शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टॅग्स:





