Satara Crime | सात लाखांहून अधिक सोनं आणि रोकड घेऊन चोरटे फरार!
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
ढेबेवाडी – पवारवाडी-कुठरे, ता. पाटण येथील दिनकर कृष्णा पवार यांच्या घराच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी व कोयंडा तोडून, चोरट्यांनी बुधवारी (दि. 20) रात्री आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.याबाबत दिनकर पवार यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारवाडी-कुठरे येथील दिनकर पवार यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून, चोरटे घरात घुसले.
घराच्या खोलीतील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून, चोरट्यांनी सोन्याचे गंठण, लक्ष्मीहार, नेकलेस, सोनसाखळी, बांगड्या, अंगठी, बुगड्या, मणी आणि रोख रक्कम, असा सात लाख 82 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. सपोनि डॉ. प्रवीण दाईंगडे, अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. डॉ. दाईगडे तपास करत आहेत.





