कारमध्ये बसली अन् …; अभिनेत्री सोनम कपूरने पापाराझींसमोर पोझ देणं टाळलं; बेबी बंप लपवल्याची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. नुकतेच ती आईवडील अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या घरी करवा चौथ साजरा करण्यासाठी आली होती. पण अभिनेत्रीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, व्हिडिओमध्ये ती तिचा बेबी बंप लपवताना दिसत असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच आता सोनम कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याची चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये सोनम तिच्या कारमध्ये बसलेली दिसत आहे. मात्र, पॅप्ससाठी पोझ देण्यासाठी ती गाडीतून खाली उतरली नाही. रिपोर्ट्सनुसार, सोनमच्या टीमने पापाराझींना त्यांचे कॅमेरे बंद करण्यास सांगितले. यामुळे सोनमने पापाराझींना टाळण्याचा प्रयत्न करण्याचे बोलले जात आहे. सोनमची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जेव्हा ती तिची चुलत बहीण अंशुला कपूरच्या साखरपुड्याला आली होती, तेव्हा तिने कॅमेऱ्यांसमोर पोज दिली नाही.
View this post on Instagram
आताही आई वडिलांची भेट घेतल्यानंतर तिने पापाराझींसमोर येणे टाळले आहे. तसेच अभिनेत्री ज्यावेळी कारमध्ये बसली. त्यावेळी ती हसताना व्हिडीओत दिसत आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी वेअर केली असल्याचे दिसत आहे. तसेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर देखील तिच्या नव्या लूकचे फोटो शेअर केले आहेत.
सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. लाल-गुलाबी रंगाचा ड्रेस वेअर केला आहे. या लूकमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या कानातील एअररिंग लक्ष वेधून घेत आहेत. सध्या सोनम कपूरच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाल्या आहेत. मात्र, अजूनही सुरू असलेल्या प्रेग्नंसीच्या चर्चांबाबत अभिनेत्री सोनम कपूरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा : सोनाली कुलकर्णीची पती कुणालसोबत जंगल सफारी; शेअर केले खास फोटो





