अभिनेत्री सोनम कपूरने १२ इंज केस केले दान; वडिलांचे मानले आभार, नेटकऱ्यांकडून कौतुक, व्हिडीओ पाहा

Actress Sonam Kapoor : गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूर हिने आपला ४० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. आता नुकतीच अभिनेत्री एका कृतीमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या व्हिडीओत ती तिचे केस दान करताना दिसत आहे. यासाठी तिने तिचे वडील अभिनेते अनिल कपूर यांचे आभार मानले आहेत. सोनम कपूर अनेकदा सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. यावेळी तिने तिचे केस कापले आहेत आणि ते केस दान करून एक अनोखे पाऊल उचलले आहे, तिच्या या कृतीमुळे तिचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
सोनमने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ती सलूनमध्ये तिचे केस कापताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती हसताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, ‘मी माझे १२ इंच केस कापले आहेत. कदाचित व्हिडिओमध्ये ते लहान दिसत असतील, पण प्रत्यक्षात ते एक फूट लांब आहेत.’ यासोबतच तिने कॅप्शनमध्ये, ‘मी माझे केस १२ इंच लहान करून ते दान करण्याचा निर्णय घेतला आहे. इतक्या सुंदर जीन्ससाठी अनिल कपूरचे आभार, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांकडून अभिनेत्रीच्या कृतीचे कौतुक करण्यात येत असून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. एका युजरनीने म्हटले आहे की , ‘सोनम, तुझे नवीन हेअरकट तुझ्यावर खूपच छान दिसतेय.’ तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, खूप सुंदर केस. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, तिने केस दान करून इतका मोठा त्याग केला, हे खूप कौतुकास्पद काम आहे.
हेही वाचा : “नमाज दिवसातून पाचवेळा असते, वारी वर्षातून एकदा…”; अबू आझमींना मुश्रीफांनी सुनावले





