Duleep Trophy 2025 : सर्फराझ खान अचानक संघाबाहेर, ‘इतके’ दिवस खेळू शकणार नाही क्रिकेट, काय आहे कारण? जाणून घ्या

दुखापतीमुळे सर्फराझ दुलीप ट्रॉफीतून बाहेर –
बुची बाबू टूर्नामेंटमध्ये हरियाणाविरुद्ध शतक ठोकताना सर्फराझला क्वाड्रिसेप्स (मांडीच्या स्नायूत) दुखापत झाली. यामुळे तो दुलीप ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. सूत्रांनुसार, या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी लागेल. सध्या तो सेंटर ऑफ एक्सीलन्स (CoE) येथे पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे.
Sarfaraz Khan and DSP Siraj have arrived at Centre of Excellence in Bengaluru for the FITNESS TEST! #TeamIndia #Cricket #MohammedSiraj #SarfarazKhan pic.twitter.com/r5nbIti75T
— OneCricket (@OneCricketApp) August 31, 2025
सर्फराझने बुची बाबू टूर्नामेंटमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. हरियाणाविरुद्ध त्याने १११ धावांची तडाखेबंद खेळी केली, जी जवळपास रन-अ-बॉलच्या वेगाने आली. याशिवाय, स्पर्धेतील पहिल्या सामन्यात तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन प्लेइंग इलेव्हनविरुद्ध त्याने ११४ चेंडूंमध्ये १३८ धावांची आक्रमक खेळी साकारली होती. त्याची ही कामगिरी आगामी कसोटी हंगामासाठी त्याची दावेदारी मजबूत करत होती, परंतु ही दुखापत त्याच्यासाठी मोठा धक्का ठरू शकते.
हेही वाचा – DPL 2025 : नितीश-दिग्वेशच्या भांडणात सहकारी खेळाडूंनी घेतली उडी, हर्षित-सॉल्ट आणि सैनीने राणाला दिला पाठिंबा
सर्फराझच्या जागी या खेळाडूला मिळू शकते संधी –
सर्फराझच्या जागी आता पश्चिम क्षेत्रासाठी राखीव खेळाडू म्हणून समाविष्ट केलेला बडोद्याचा फलंदाज शिवालिक शर्मा याला संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवालिकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १८ सामन्यांत ४३.४८च्या सरासरीने १,०८७ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. मागील हंगामात त्याने सात सामन्यांत ४४.००च्या सरासरीने ४८४ धावा केल्या होत्या





