DPL 2025 : नितीश-दिग्वेशच्या भांडणात सहकारी खेळाडूंनी घेतली उडी, हर्षित-सॉल्ट आणि सैनीने राणाला दिला पाठिंबा

Nitish Rana and Digvesh Rathi Fined After Heated Clash : दिल्ली प्रीमियर लीगच्या (डीपीएल) एलिमिनेटर सामन्यात वेस्ट दिल्ली लायन्सचा कर्णधार नितीश राणा आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्सचा गोलंदाज दिग्वेश राठी यांच्यात तीव्र शाब्दिक वाद झाला. या घटनेमुळे दोन्ही खेळाडूंवर भारी दंड ठोठावण्यात आला आहे. राणाच्या तुफानी शतकाच्या (१३४ धावा) जोरावर वेस्ट दिल्ली लायन्सने साउथ दिल्ली सुपरस्टार्सवर सात गडी राखून विजय मिळवला, परंतु सामन्यादरम्यानच्या या वादाने सर्वांचे लक्ष वेधले.
राणी आणि राठीमध्ये का झाला वाद?
सामन्यादरम्यान राठी गोलंदाजी करत असताना त्यांनी रन-अप पूर्ण केला, परंतु चेंडू टाकला नाही. यावर राणाने मजेशीरपणे स्वीप शॉट खेळला. राठी हसत मागे फिरला. मात्र, पुढील चेंडूवर राणा मागे सरकली आणि यावेळी दोघांमध्ये काही शब्दांची देवाणघेवाण झाली. समालोचकांना मैदानावरील हा वाद मजेशीर वाटत होता.
Boys living upto the reputation and meeting the expectations 😂😂 #nitishrana #digveshrathi pic.twitter.com/oB0M3qJRyR
— vk0707 (@vk_0707) August 30, 2025
यानंतर राठीने चेंडू टाकला आणि राणाने रिव्हर्स स्वीप खेळत डीप पॉइंटवर शानदार षटकार लगावला. षटकारानंतर राणा बॅटला चुंबन देत पुढे गेला. यावेळी कोण काय बोलले हे स्पष्ट नाही, परंतु वातावरण तणावपूर्ण झाले. राणा रागात राठीकडे गेला, परंतु पंच गायत्री वेणुगोपालन आणि क्षेत्ररक्षकांनी दोघांना वेगळे केले.
हेही वाचा – Hockey Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, जपानचा ३-२ ने उडवला धुव्वा
राणाच्या पोस्टवर इतर खेळाडूंच्या प्रतिक्रिया –
The comment section is flooding on Nitish Rana’s post with his former KKR teammates! 💬💜😅#KKR #NitishRana #Cricket #DPL2025 #Sportskeeda pic.twitter.com/toh3jbCRLX
— Sportskeeda (@Sportskeeda) August 31, 2025
सामन्यानंतर राणाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केली, ज्यात सामन्याचा एक फोटोही होता. या पोस्टवर सहखेळाडूंनी प्रतिक्रिया दिल्या. भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाने मजा घेत लिहिले, “ये हुई ना बात.” नवदीप सैनीने लिहिले, “स्वाद आ गया रात.” सुयश शर्माने प्रशंसा करत म्हटले, “यही कारण है कि मैं हमेशा आपको बादशहा कहता हूँ.” फिल सॉल्टने लिहिले, “राणा जी.”
राणाने याबाबत सांगितले, “हा प्रश्न कोण बरोबर किंवा चूक याचा नाही. तो त्याच्या संघासाठी आणि मी माझ्या संघासाठी जिंकवण्यासाठी खेळत होतो. पण क्रिकेटच्या खेळाचा सन्मान राखणे ही माझी आणि त्याचीही जबाबदारी आहे. त्यानेच ही सुरुवात केली. मी काय किंवा कसे झाले हे सांगणार नाही, कारण ते योग्य ठरणार नाही.” या वादामुळे दोन्ही खेळाडूंवर दंड ठोठावण्यात आला असून, ही घटना सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.





