Santosh Deshmukh Murder – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. बीडमध्ये आक्रोश मोर्चाही काढण्यात आला. त्या मोर्चाला जमलेला जनसमुदाय पाहता पोलीस आणि सरकारवरील दबावही वाढत चालला आहे. हे प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून असून तपासाला वेग आला आहे. या खून प्रकरणाशी संबंधित आतापर्यंत 100 जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून महत्वाची माहिती सीआयडीला मिळाल्याचे समजत आहे. चौकशीचे हे सत्र सीआयडीने सुरूच ठेवले आहे. सीआयडी चौकशीत कोण कसुर ठेवण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे सीआयडीचे वरिष्ठ अधिकारीही बीडमध्ये तळ ठोकून आहेत. आतापर्यंत शंभर जणांची चौकशी या प्रकरणी झाली आहे. आजही सीआयडीने पाच ते सहा जणांना या प्रकरणा चौकशीसाठी बोलावले होते. त्यांच्याकडून काही माहिती मिळते का यासाठी सीआयडी प्रयत्नशील आहे. ज्या शंभर जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्या आधारे या सहा जणांचीही चौकशी केली जात आहे. त्यातून सीआयडीच्या हाती काही तरी नक्की लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील तीन मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच दिले आहेत. शिवाय वाल्मिक कराडच्या कुटुंबीयांची ही चौकशी केली गेली आहे. त्याच वेळी बीड येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी सर्वांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. शिवाय धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणीही करण्यात आली होती. मुंडे यांच्या विरोधात सध्या स्वपक्षियां बरोबरच विरोधातील आमदारही एकवटले आहेत.