Santosh Deshmukh Case : देशमुख प्रकरणाला उज्ज्वल निकम न्याय देऊ शकतील का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
Updated On:

मुंबई – संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करावी, या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ कालपासून अन्नत्याग आंदोलनाला बसले होते.
आज शासनाकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत मोठी शंका उपस्थित केली आहे.
उज्ज्वल निकम हे भाजपचे सदस्य आहेत. त्यामुळे ते या प्रकरणात न्याय देऊ शकतील का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.





