Sanju Samson Record : संजू सॅमसनने आयपीएल कारकीर्दीत पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी; या बाबतीतही पटकावले अव्वल स्थान
Sanju Samson Record : संजू ह सॅमसनने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एक नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.

Sanju Samson player of the match record : आयपीएल २०२६ च्या हंगामातील ४८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सीएसके यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. ज्यामध्ये १५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेने हा सामना एकतर्फी ८ गडी राखून जिंकला. या विजयात स्टार फलंदाज संजू सॅमसनने मोलाची भूमिका बजावली. या कामगिरीसह सॅमसनने आपल्या आयपीएल कारकिर्दीत एक नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे.
संजू सॅमसनची उत्कृष्ट कामगिरी –
या सामन्यात संजू सॅमसनने ५२ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावांची आक्रमक खेळी साकारली. आयपीएल २०२६ मध्ये त्याचा फॉर्म अत्यंत उत्कृष्ट राहिला आहे. त्याने १० सामन्यांत ५७.५३ च्या सरासरीने तब्बल ४०२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. दिल्लीविरुद्धच्या या सामन्यातील ८७ धावांच्या खेळीसाठी त्याला ‘सामनावीर’ (Player of the Match) चा पुरस्कार देण्यात आला.
Sanju Samson joins the elite company of IPL greats!
Equals Kieron Pollard, Suresh Raina and Jos Buttler with 14 POTM awards – now the joint 13th highest in IPL history!
From underrated talent to certified match-winner!#SanjuSamson #KieronPollard #sureshraina #JosButtler pic.twitter.com/P4nIlNNuPb
— Dream Comparison (@dreamcomparison) May 6, 2026
संजू सॅमसनने २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर प्रथमच तो एकाच हंगामात तीन वेळा ‘सामनावीर’चा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या मोसमात त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हा पुरस्कार पटकावला आहे.
पुरस्कारांच्या शर्यतीत सॅमसन अव्वल स्थानावर –
या हंगामात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकण्याच्या यादीत संजू सॅमसन तीन पुरस्कारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ जेसन होल्डर, जोश हेझलवुड, प्रियांश आर्या, केएल राहुल, समीर रिझवी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन वेळा हा मान मिळवला आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या दृष्टीने यंदाचा मोसम चढ-उतारांचा राहिला आहे. सीएसकेने आतापर्यंत १० सामन्यांतून ५ विजय आणि ५ पराभवांसह १० गुणांची कमाई करत प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले आहे. सीएसकेचा पुढचा सामना १० मे रोजी घरच्या मैदानावर लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध होणार आहे.





