Sanju Samson : संजू सॅमसनचं मोठं कमबॅक! या स्पर्धेसाठी मिळाली संघाची मोठी जबाबदारी

सॅमसन बंधूंची जोडी गाजवणार मैदान –
या संघाचे विशेष आकर्षण म्हणजे संजूचा भाऊ, सॅली सॅमसन यालाही संघात स्थान मिळाले आहे. यापूर्वी केरळ क्रिकेट लीगमध्ये (KCL) हे दोन्ही भाऊ एकत्र खेळताना दिसले होते. केसीएलच्या दुसऱ्या हंगामात सॅलीने ‘कोची ब्लू टायगर्स’चे नेतृत्व केले होते आणि फलंदाजीसह कर्णधार म्हणूनही चांगली कामगिरी केली होती. आता हे सॅमसन बंधू केरळ राज्यासाठी एकत्र खेळताना दिसतील.
संघातील इतर महत्त्वाचे बदल –
संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी अहमद इम्रानवर सोपवण्यात आली आहे. याशिवाय आयपीएलचा अनुभव गाठीशी असलेले विग्नेश पुथुर आणि विष्णू विनोद यांचाही संघात समावेश आहे. केसीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा गोलंदाज अखिल स्कारिया यालाही संधी मिळाली आहे. मात्र, अनुभवी खेळाडू सचिन बेबी याला संघात स्थान मिळवता आले नाही.
२६ नोव्हेंबरला होणार पहिला सामना –
केरळचा संघ ‘अ’ गटात असून त्यांच्यासोबत चंदिगढ, ओडिशा, विदर्भ, रेल्वे, आंध्र प्रदेश आणि मुंबई हे संघ आहेत. केरळचा पहिला सामना २६ नोव्हेंबरला ओडिशाविरुद्ध होणार आहे. संघाचे सर्व सामने लखनौमध्ये खेळवले जातील. मध्य प्रदेशविरुद्ध रणजी सामना खेळलेले खेळाडू इंदूरहून थेट लखनौला पोहोचतील, तर उर्वरित खेळाडू आज रवाना होत आहेत.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी केरळचा संघ:
संजू सॅमसन (कर्णधार/यष्टिरक्षक), रोहन कुन्नुम्मल, मोहम्मद अझरुद्दीन, अहमद इम्रान (उपकर्णधार), विष्णू विनोद, कृष्णा दिवाण, अब्दुल बाजीथ, सॅली सॅमसन, सलमान निझार, कृष्णा प्रसाद, सिबिन पी गिरीश, अंकित शर्मा, अखिल स्कारिया, बीजू नारायणन, आसिफ केएम, एमडी निधिश, विग्नेश पुथुर, शराफुद्दीन एनएम.





