Sanju Samson Record : विश्वचषकानंतर आयपीएलमध्येही संजू सॅमसनचीच दहशत! हंगामातील दुसरे शतक झळकावत रचला इतिहास
Sanju Samson Record : संजू सॅमसनच्या शतकी खेळीमुळे, चेन्नई सुपर किंग्सने २० षटकांत ६ गडी गमावून २०७ धावांचा डोंगर उभारला आहे.

Sanju Samson Century Record against Mumbai Indians IPL 2026 : वानखेडे स्टेडियम आणि संजू सॅमसन यांचे एक अजब नाते आहे. २३ एप्रिल २०२६ च्या रात्री या ऐतिहासिक मैदानावर संजूने पुन्हा एकदा आपल्या बॅटचा तडाखा दाखवत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. टी-२० विश्वचषकातील आपला फॉर्म आयपीएलमध्येही कायम राखत संजूने या हंगामातील दुसरे शतक ठोकून इतिहास रचला आहे.
संजूचा सॅमसनने झळकावले दमदार शतक –
टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध ८९ धावांची स्फोटक खेळी करणाऱ्या संजू सॅमसनने आता आयपीएलमध्येही आपला रुद्रावतार धारण केला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना संजूने वानखेडेच्या सपाट खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला आणि अवघ्या ५४ चेंडूंमध्ये १०१ धावांची नाबाद शतकी खेळी साकारली. या शतकी खेळीत त्याने १० चौकार आणि ६ उत्तुंग षटकार खेचले.
An innings that pushed @chennaiipl forward, an innings that held them together 👊
Sanju Samson with his 5️⃣th #TATAIPL ton tonight, staying unbeaten through the innings 👏
Scorecard ▶️ https://t.co/gGt34dqUoq#TATAIPL | #KhelBindaas | #MIvCSK pic.twitter.com/Kgf5FGl7IO
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाची केली धुलाई –
What composure. What striking 💛
𝐒𝐚𝐧𝐣𝐮 𝐒𝐦𝐚𝐬𝐡𝐢𝐧𝐠 𝐒𝐚𝐦𝐬𝐨𝐧 🔥
Scorecard ▶️ https://t.co/gGt34dqUoq#TATAIPL | #KhelBindaas | #MIvCSK | @ChennaiIPL | @IamSanjuSamson pic.twitter.com/2Hr9Ui0UEn
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) सलामीला आलेल्या संजूने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. मुंबईकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या कृष भगत याला संजूने अजिबात थारा दिला नाही. कृषच्या एका षटकात १५ धावा वसूल करत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. पॉवरप्ले संपला तेव्हा चेन्नईची धावसंख्या ७३/२ होती, ज्यात संजूच्या ३५ धावांचा समावेश होता. डावाच्या शेवटच्या षटकातही कृष भगतच्या चेंडूंवर सलग फटकेबाजी करत संजूने आपले या मोसमातील दुसरे शतक पूर्ण केले.
संजूचा सॅमसनने सीएसकेसाठी रचला इतिास –
In style 😎
A rollicking way to reach a sensational HUNDRED 💯
Well played, @IamSanjuSamson 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/gGt34dqUoq#TATAIPL | #KhelBindaas | #MIvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/ulFE1YPTc2
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
संजू सॅमसनने आता सीएसकेकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिले स्थान पटकावले आहे. सॅमसनच्या आधी, सीएसकेकडून खेळताना ऋतुराज गायकवाड, मुरली विजय आणि शेन वॉटसन यांनी आयपीएलमध्ये प्रत्येकी दोन शतके झळकावली आहेत. मात्र, संजू सॅमसनने कमी डावात हा पराक्रम सीएसकेसाठी इतिहास रचला आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत केएल राहुलची बरोबरी केली आहे, या दोघांनी प्रत्येकी पाच शतके झळकावली आहेत. या यादीत विराट कोहली आयपीएलमध्ये आठ शतकांसह अव्वल स्थानी आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे खेळाडू:
- ८ विराट कोहली
- ७ जोस बटलर
- ६ ख्रिस गेल
- ५ संजू सॅमसन
- ५ केएल राहुल





