Sanju Samson : संजू सॅमसन CSK नव्हे KKR मध्ये जाणार? आकाश चोप्राने सांगितले शाहरुख खानच्या टीमकडे जाण्याचे कारण

आकाश चोप्रा मते संजूसाठी केकेआर असेल उत्सुक –
मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राच्या मते, संजू सॅमसनला आपल्या संघात सामील करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) जास्त उत्सुक असेल. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोप्रा म्हणाला, “माझ्या मनात पहिले नाव चेन्नईचे नाही, तर केकेआरचे आहे. केकेआरकडे भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज नाही, ज्यामुळे त्यांचे हात बांधले गेले आहेत. शिवाय, जर एखादा कर्णधार मिळाला तर त्यात काय हरकत आहे?”
अजिंक्य रहाणेची प्रशंसा, पण सॅमसनवर लक्ष –
Reports suggest Sanju Samson wants to leave RR. Where could he go next? pic.twitter.com/a3inzU0F49
— Aakash Chopra (@cricketaakash) August 8, 2025
आकाश चोप्राने केकेआरचा मागील हंगामात कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेची प्रशंसा केली. त्यानी सांगितले की, रहाणेने चांगली कर्णधारी आणि फलंदाजी केली, परंतु त्याच्या वयामुळे केकेआर सॅमसनला गंभीरपणे विचारात घेऊ शकते. सॅमसनमुळे संघाच्या फलंदाजीला लवचिकता आणि यष्टीरक्षक म्हणून खोली मिळू शकते. चोप्राने असेही सुचवले की, केकेआर वेंकटेश अय्यरला रिलीज करून 24 कोटी रुपये वाचवू शकते आणि संघात बदल घडवू शकते.
राजस्थान रॉयल्सकडे टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजांची गर्दी –
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सने जोस बटलरला रिलीज केले आणि सॅमसनला कायम ठेवले. आता संघाकडे यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांसारखे युवा सलामीवीर आहेत, तर ध्रुव जुरेलला देखील वरच्या क्रमांकावर खेळवता येऊ शकते. यामुळे कदाचित सॅमसनने संघ सोडण्याचा निर्णय घेतला असावा.
हेही वाचा – Haider Ali : क्रिकेट विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या क्रिकेटरला चालू सामन्यातून अटक, काय आहे प्रकरण?
संजू सॅमसन यष्टीरक्षक-कर्णधार अन् सलामीवीर –
संजू सॅमसन 2013 ते 2015 आणि 2018 पासून राजस्थान रॉयल्ससोबत आहे. 2022 पासून तो संघाचा कर्णधार आहे. यष्टीरक्षक, कर्णधार आणि सलामी फलंदाज म्हणून सॅमसन एक उत्तम पर्याय आहे. आयपीएलमधील 176 सामन्यांत त्याने 3 शतके आणि 26 अर्धशतके झळकावत 4,704 धावा केल्या आहेत. जर राजस्थान रॉयल्सने त्याला रिलीज किंवा ट्रेड केले, तर सीएसके आणि केकेआरसारखे संघ त्याला आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी उत्सुक असतील.





