Vaibhav Suryavanshi Under 19 ODI Records : शनिवारी इंग्लंड अंडर-१९ विरुद्ध भारत अंडर-१९ चौथ्या यूथ वनडे सामन्यात वैभवने ७७ चेंडूत नाबाद १४४ धावांची तुफानी खेळी साकारली. ज्यामध्ये १० षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. यासह त्याने अनेक विक्रम मोडत इतिहास रचला आहे. त्याने २०० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. या खेळीमुळे तो अंडर-१९ वनडे सामन्यात सर्वात जलद शतक, सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
वैभव सूर्यवंशीने ठोकले सर्वात जलद शतक –
या मालिकेत वैभव सूर्यवंशीने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. तिसऱ्या सामन्यात त्याने अवघ्या २४ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले, ज्यामध्ये ८ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर ५२ चेंडूत १० चौकार आणि ७ षटकारांसह शतक पूर्ण केले. या खेळीने त्याने युथ वनडेमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम नोंदवला. वैभवने ५२ चेंडूत शतक झळकावत पाकिस्तानच्या कामराम गुलामचा ५३ चेंडूंचा विक्रम मोडला.
Vaibhav Suryavanshi slams a 52-ball Century – A Spectacular Display of Power Hitting!
Pure Carnage….. pic.twitter.com/6XkrXP6j1g
— Varun Giri (@Varungiri0) July 5, 2025
वैभव सूर्यवंशीने लावली विक्रमांची रांग –
VAIBHAV SURYAVANSHI MADNESS IN U19 YOUTH ONE DAY SERIES..!! 🥶🔥
– 48 (19) in 1st One Day.
– 45 (34) in 2nd One Day.
– 86 (31) in 3rd One Day.
– 82* (41) Today. pic.twitter.com/aiG2GU5ard— Sports Culture (@SportsCulture24) July 5, 2025
यापूर्वी, २ जुलै रोजी तिसऱ्या वनडे सामन्यात वैभवने ३१ चेंडूत ८६ धावा (९ षटकार, ६ चौकार) करत भारताला ४ गडी राखून विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, ज्यामुळे तो अंडर-१९ वनडेमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा दुसरा खेळाडू आणि सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला. याशिवाय, एका अंडर-१९ वनडे डावात सर्वाधिक ९ षटकार ठोकण्याचा विक्रमही त्याने नोंदवला, ज्याने यापूर्वी मनदीप सिंह आणि राज बावाच्या ८ षटकारांचा विक्रम मोडला.
वैभवच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताने ५ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-१ ने अशी आघाडी घेतली आहे. याशिवाय, वैभव आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ३५ चेंडूत शतक ठोकून सर्वात कमी वयात आयपीएल शतक करणारा खेळाडू ठरला होता. त्याच्या या कामगिरीने क्रिकेट विश्वात त्याच्याकडे भविष्यातील सुपरस्टार म्हणून पाहिले जात आहे