PBKS vs SRH : पंजाबने हैदराबादचा धुव्वा उडवत केली ऐतिहासिक विजयाची नोंद, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ
PBKS vs SRH : या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ६ बाद २१९ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्त्युतरात पंजाबने १८.५ षटकांत सामना जिंकला.

PBKS vs SRH Punjab Kings won by 6 wickets : आयपीएल २०२६ च्या १८ व्या सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) सनरायझर्स हैदराबादवर ६ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. यासह पंजाबने श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली तिसऱ्या विजयाची नोंद केली. तसेच पंजाबने पुन्हा एकदा अशक्य वाटणारा विजय मिळवत इतिहास रचला आहे.
हैदराबादच्या २२० धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात दमदार झाली. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग यांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. प्रियांश आर्याने अवघ्या २० चेंडूंत ५७ धावांची स्फोटक खेळी करत विजयाचा पाया रचला. या विजयासह पंजाब किंग्सने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग (Chase) करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
प्रियांशचे वादळ अन् श्रेयसचा फिनिशिंग टच –
Oozing style and confidence 😎
Captain Shreyas Iyer took @PunjabKingsIPL towards victory with such delightful shots 🙌
Scorecard ▶️ https://t.co/DUNkQi9YaV#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvSRH | @ShreyasIyer15 pic.twitter.com/zDeejeklbm
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2026
त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ३३ चेंडूंमध्ये ६९ धावांची नाबाद शानदार खेळी करून लक्ष्याचा पाठलाग सोपा करून दाखवला. अखेरीस शशांक सिंग १६ धावांवर नाबाद राहिला. या हंगामातील पंजाब किंग्सचा हा तिसरा विजय आहे. त्यांनी चार सामने खेळले आहेत, पण त्यापैकी एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. ते सात गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, हैदराबाद चार सामन्यांत तीन पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे.
𝑷𝒖𝒏𝒋𝒂𝒃𝒊 𝒎𝒖𝒏𝒅𝒆𝒚𝒂𝒏 𝒕𝒆 𝒅𝒐𝒖𝒃𝒕 𝒏𝒊 𝒌𝒂𝒓𝒊! 💥 pic.twitter.com/xCoZdzTgNy
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 11, 2026
पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हैदराबादच्या सलामीवीरांनी हा निर्णय सुरुवातीला चुकीचा ठरवला. अभिषेक शर्माने (७४) अवघ्या २८ चेंडूंत ८ षटकार ठोकत २६४ च्या स्ट्राईक रेटने पंजाबच्या गोलंदाजांना अक्षरशः कुटून काढले. ट्रॅव्हिस हेडनेही ३८ धावांचे योगदान दिले. मात्र, त्यानंतर हैदराबादची मधली फळी कोसळली.कर्णधार इशान किशन (२७) आणि सलिल अरोरा (९) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.
अर्शदीप-शशांकचा पलटवार –
हेनरिक क्लासेनने ३९ धावांची झुंजार खेळी केल्यामुळे हैदराबादने धावफलकावर मोठी धावसंख्या उभी केली. पंजाबकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने २ बळी घेतले असले, तरी तो महागडा ठरला, त्याने ५० धावा खर्च केल्या. तर शशांक सिंगनेही २ महत्त्वाचे विकेट्स घेत हैदराबादच्या धावगतीला ब्रेक लावला. झेव्हियर बार्टलेटला १ विकेट मिळाली.





