Sanju Samson Record : संजू सॅमसनचा वानखेडेवर शतकी जलवा! मुंबईची दाणादाण उडवत रोहित शर्माच्या ‘विराट’ विक्रमाशी केली बरोबरी
Sanju Samson Record : संजू सॅमसनने टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन' रोहित शर्मा याच्या एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Sanju Samson 8th T20 Century Record : आयपीएल २०२६ मधील ३३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईच्या संजू सॅमसनने आपल्या बॅटची जादू दाखवत मुंबईच्या गोलंदाजांची दाणादण उडवली. यासह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याच्या एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित २० षटकांत २०७ धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्येचा खरा शिल्पकार ठरला तो सलामीवीर संजू सॅमसन. संजूने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्ला चढवला आणि अवघ्या ५४ चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावांची झंझावाती खेळी केली. या शतकासह संजूने या हंगामातील आपले दुसरे शतक पूर्ण केले असून टी-२० क्रिकेटमधील आपल्या एकूण शतकांची संख्या ८ वर नेली आहे.
In style 😎
A rollicking way to reach a sensational HUNDRED 💯
Well played, @IamSanjuSamson 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/gGt34dqUoq#TATAIPL | #KhelBindaas | #MIvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/ulFE1YPTc2
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
संजूने हिटमॅनच्या विक्रमाशी केली बरोबरी –
An innings that pushed @chennaiipl forward, an innings that held them together 👊
Sanju Samson with his 5️⃣th #TATAIPL ton tonight, staying unbeaten through the innings 👏
Scorecard ▶️ https://t.co/gGt34dqUoq#TATAIPL | #KhelBindaas | #MIvCSK pic.twitter.com/Kgf5FGl7IO
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2026
या शतकी खेळीसह संजू सॅमसनने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहितच्या नावावर ८ शतके आहेत, आता संजूही त्याच स्थानावर पोहोचला आहे. संजूने आतापर्यंत ३३७ टी-२० सामन्यांमध्ये ३०.९३ च्या सरासरीने ८६९३ धावा केल्या असून, यात ८ शतके आणि ५४ अर्धशतकांचा समावेश आहे.
टी-२० मध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे भारतीय:
The way Sanju Samson was badly trolled by people just a few months ago, today I feel so happy for him that I can’t even express it.
2 hundreds in IPL , Take a bow Sanju. pic.twitter.com/BXRsUswd4U
— Surbhi (@SurrbhiM) April 23, 2026
१. विराट कोहली – ९ शतके
२. अभिषेक शर्मा – ९ शतके
३. रोहित शर्मा – ८ शतके
४. संजू सॅमसन – ८ शतके
वानखेडेची छोटी बाऊंड्री आणि सपाट खेळपट्टीचा फायदा घेत संजूने मुंबईच्या चाहत्यांसमोरच हा पराक्रम केला. चेन्नईने दिलेल्या २०८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक होणार की सूर्या-हार्दिकची जोडी हे आव्हान पेलणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





