Sanju Samson Record : संजू सॅमसनचा ‘विराट’ पराक्रम! रैना-धोनीला मागे टाकत रचला इतिहास; सर्वात जलद ‘हा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय
Sanju Samson Record : आयपीएलच्या १९ व्या हंगामात संजू सॅमसनची बॅट सातत्याने तळपत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात संजूने कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर चौकार ठोकताच नवा पराक्रम केला.

Sanju Samson fastest 5000 IPL runs record : चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएल २०२६ च्या ३७ व्या सामन्यात संजू सॅमसनने आपल्या नावावर एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना संजूने केवळ ३ धावा पूर्ण करताच ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना आणि एमएस धोनी या दिग्गजांना मागे टाकत एक नवा पराक्रम केला आहे.
आयपीएलच्या १९ व्या हंगामात संजू सॅमसनची बॅट सातत्याने तळपत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात संजूने कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर चौकार ठोकताच आयपीएलमधील आपल्या ५००० धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, सर्वात कमी चेंडूंमध्ये हा पल्ला गाठणारा संजू सॅमसन आता सर्वात वेगवान भारतीय खेळाडू ठरला आहे.
सुरेश रैनाचा मोडला रेकॉर्ड –
🚨RECORD ALERT :
Sanju Samson has JUST smashed 5,000 career runs in the TATA IPL — the 10th player EVER to join this elite club in the league’s 19th season! 👑
The CSK star turned up in the CSK vs GT clash and etched his name forever.
From 184 matches: 5,000+ runs | Avg 31.83… pic.twitter.com/hVR9Da8S62
— RAJAT (@RajatJain) April 26, 2026
याआधी सर्वात कमी चेंडूंमध्ये ५००० धावा करण्याचा भारतीय विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता. रैनाने ३६२० चेंडूत हा टप्पा गाठला होता, तर संजूने अवघ्या ३५५५ चेंडूंत हे यश मिळवून नवा इतिहास रचला आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर संजू आता एबी डिव्हिलियर्स (३२८८ चेंडू) आणि डेव्हिड वॉर्नर (३५५४ चेंडू) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने केएल राहुल आणि एमएस धोनी यांसारख्या मोठ्या नावांनाही या शर्यतीत मागे टाकले आहे.
स्वस्तात झाला बाद –
Sanju Samson IPL में नया इतिहास रचते हुए सबसे तेज ‘5000’ रन बनाने वाले भारतीय खिलाड़ी बन गए हैं#SanjuSamson #CSKvsGT #IPL #IPLRecords #Cricket #IPL2026 | Sanju Samson IPL Records | @IamSanjuSamson pic.twitter.com/qmYggoKNFO
— Times Now Navbharat (@TNNavbharat) April 26, 2026
या हंगामात संजूने दोन धडाकेबाज शतके झळकावली असली, तरी गुजरातविरुद्धच्या सामन्यात तो मोठी खेळी करू शकला नाही. विक्रमी ५००० धावांचा टप्पा पार केल्यानंतर तो १५ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. संजूच्या नावावर आता १८५ आयपीएल सामन्यांत ३१.६९ च्या सरासरीने ५००८ धावा जमा आहेत, ज्यामध्ये ५ शतके आणि २६ अर्धशतकांचा समावेश आहे. संजूच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारतीय संघातील त्याचे स्थान अधिक बळकट झाले आहे.





