Mahayuti News : मोठी बातमी..! शिवसेना-भाजपची युती तुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने महायुतीत खळबळ; ‘स्वबळा’चे दिले संकेत
Mahayuti News : संजय शिरसाट यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढू शकते, असे संकेत दिले आहेत.

Mahayuti News : भाजप भविष्यातील निवडणुका ‘स्वबळावर’ लढणार आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे. उद्या शिंदेंचे आमदारही भाजपमध्ये जातील, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं ‘सामना’ अग्रलेखातून केला आहे. (Mahayuti News)
त्यामुळे भाजपकडून २०२९ मध्ये स्वबळावर लढण्याची तयारी सुरू झालीय का? अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. यावर भाष्य करताना मंत्री संजय शिरसाट यांनीही मोठे संकेत दिले आहेत.
२०२९ मध्ये भाजप स्वबळावर लढू शकते. शिवसेना देखील स्वबळावर लढू शकते. निवडणुका कशा लढायच्या, यासाठी राजकारणात कोणताही बॉन्ड किंवा करार करून घेतलेला नसतो, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. (Mahayuti News)
संजय शिरसाट म्हणाले, प्रत्येक पक्ष हा आपल्या परीने तयारी करत असतो. २०२९ मध्ये भाजप स्वबळावर लढू शकते. शिवसेना देखील स्वबळावर लढू शकते. निवडणुका कशा लढायच्या, यासाठी राजकारणात कोणताही बॉन्ड किंवा करार करून घेतलेला नसतो. (Mahayuti News)
एका जागेसाठी शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती. भाजपनं किंवा इतर पक्षाने स्वबळासाठी तयार केली असेल तर त्यात काहीही गैर नाही. सगळे पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) हे उबाठासोबत राहतील आणि त्यांच्या नेत्याला (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री करतील, हे फक्त स्वप्न राहणार आहे. स्वप्न पाहण्यापेक्षा वास्तवाला सामोरे गेले पाहिजे.
येणारे संकट आणि आव्हानाला सामोरे जाण्याची ताकद शिवसेनेत आहे. कोण काय करतंय, यापेक्षा आमचा पक्ष कसा पुढे घेऊन जायचा, याची चिंता करत असतो. इतरांवर टीका करून आमचा पक्ष मोठा होईल, अशी स्वप्न आम्ही पाहत नाही, असा टोला शिरसाटांनी ठाकरेंच्या शिवसेनेला लगावला आहे. (Mahayuti News)





