Sanjay Raut : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोठा धक्का बसला आहे. उबाठातील काही माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत आपल्या हाती कमळ घेतले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच उबाठाचे नाशिकमधील मोठं नाव सुधाकर बडगुजर यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले. यानंतर उबाठा गटाने नाशिकमध्ये मोठा फेरबदल करत विलास शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली. महानगरप्रमुख पदी मामा राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेच मामा राजवाडे आणि उपनेते सुनील बागूल भाजपच्या वाटेवर आहेत. मात्र, संजय राऊत यांनी केलेल्या एका पोस्टमुळे त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला ‘ब्रेक’ लागला असल्याची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने शंबर प्लसचा नारा दिला आहे. उबाठा गटातील वादग्रस्त माजी नगरसेवक आपलेसे करून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यादृष्टीने भाजप आपली वाटचाल करत आहे. सुधारकर बुडगुजर यांना आपलेसे करून घेण्यात भाजपला यश आले. यानंतर आता भाजपकडून नूतन महागरप्रमुख मामा राजवाडे आणि उपनेते सुनील बागूल यांना भाजप प्रवेशसाठी मुंबई भाजप कार्यालयात प्रवेश होणार होता. त्यासाठी ते मुंबईतही दाखल झाले होते. मात्र, संजय राऊतांनी केलेल्या एका ट्वीटमुळे भाजपची पोलखोल केली. राऊतांनी भाजपवर टीकेची झोड उठवत पोलिस यंत्रणेच्या गैरवापराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. फरारी आरोपींना भाजप प्रवेश देत असल्याची टीका त्यांनी केली होती. यामुळे भाजप नेतृत्वाने बागूल आणि राजवाडे यांचा पक्षप्रवेश तूर्त थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊतांचे ट्वीट ‘भारतीय जमवाजमव पार्टीची कमाल आहे. नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले… क्लायमॅक्स असा, की हे सगळे फरार (भाजपसाठी गुन्हेगार) आज भाजपत प्रवेश करत आहेत! जमवाजमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता, पैसा, दहशत! दुसरे काही नाही!’ महानगरप्रमुखपदी प्रथमेश गिते उपमहापौर प्रथमेश गितेंची नाशिक उबाठाच्या महानगरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. हेही वाचा : अमेरिकन संसदेत ‘वन बिग ब्युटीफुल’ मंजूर ; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, जाणून घ्या आता कोणते बदल होतील?