Sanjay Raut : दसरा मेळाव्यानंतर मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची चर्चा शिंदेंच्या आमदाराने केलेल्या दाव्यामुळे होत आहे. शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी दोन आमदार सोडले तर उर्वरीत सर्व आमदार आणि मुंबई महापालिकेतील जवळपास 80 टक्के उरलेले सर्व माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तयार आहेत, असा मोठा दावा केला आहे. तुमाने यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली असून उबाठाचे खासदार संजय राऊतांनी यांनी त्यांनी केलेल्या दाव्यावर भाष्य करत टीकेचे बाण सोडले आहेत. कोण म्हणतयं हे? ज्यांचा आम्ही लोकसभेला पराभव केला. दारून पराभव केला…. तुम्ही का या लोकांना महत्व देताहेत, हे फस्ट्रेशन असल्याची टीका राऊतांवर तुमाने यांच्यावर केली आहे. त्यांचा पक्ष भाजपात विलिन होण्याची चर्चा सुरू झाली आहे, असा दावा करत हे त्यांना माहिती नसावं, असा टोला राऊतांनी तुमानेंना लगावला आहे. काय म्हणाले संजय राऊत? कोण म्हणतयं हे? ज्यांचा आम्ही लोकसभेला पराभव केला. दारून पराभव केला. तुम्ही का या लोकांना महत्व देताहेत? हे फस्ट्रेशन आहे, ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघाला आहे, ते दुसऱ्यांचे आमदार विलिन करण्याची भाषा करत आहेत. आधी तुमचं नशीब फुटलयं ते बघा! आता निष्ठावंताचा पक्ष असून ज्यांना जायचं होतं तो गाळ निघून गेला. जे सीबीआय ईडीच्या धमक्यांनी घाबरून निघून गेले. त्यांनी आमच्या पक्षातल्या कडवट निष्ठावंताना बोलणं हा आमचा अपमान आहे, हा बाळासाहेब ठाकरेंचा अवमान आहे. ज्यांनी हा दावा केला आहे, ते कधी काळी शिवसेनेचे खासादर होते. त्यांना आम्ही निवडून आणलेलं आहे. आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला, त्यांच्याच मतदारसंघात. मग त्यांना मागच्या दाराने विधानपरिषदेवर आणलं, ते म्हणतात हे फुटणार ते फुटणार आधी तुमचं नशीब फुटलयं ते बघा! असा खोचक टोला राऊतांनी तुमानेंना लगावला आहे. राऊतांवर टीका उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या भूमिकेमुळे अनेक आमदार नाराज असल्याचं म्हटलं आहे. खासदार संजय राऊतांना सगळे कंटाळले असून राऊतांमुळे उबाठाचा सत्यानाश झाला आहे, अशी घणाघाती टीका तुमाने यांनी राऊतांवर केली आहे. हेही वाचा : Gen Z च्या आंदोलनाला नेपाळचे पंतप्रधान घाबरले ; देश सोडून दुबईला जाणार ?, उपपंतप्रधानांसह १० मंत्र्यांचे राजीनामे