Gen Z च्या आंदोलनाला नेपाळचे पंतप्रधान घाबरले ; देश सोडून दुबईला जाणार ?, उपपंतप्रधानांसह १० मंत्र्यांचे राजीनामे

Nepal Protests । सत्ताधारी नेपाळी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी त्यांच्या पक्षाच्या यूएमएलच्या मंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ओली यांनी,”जेव्हा युतीचे इतर मंत्री निघून जात आहेत, तेव्हा यूएमएलच्या मंत्र्यांनी त्यांच्या पदांवर ठाम राहावे” अदे निर्देश त्यांनी दिले आहेत.
नेपाळी माध्यमांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारीझालेल्या निदर्शनांमध्ये बाह्य समाजकंटकांचा घुसखोरी झाल्याचे ओली अजूनही ठाम आहेत, ज्यामुळे परिस्थिती हिंसक झाली. त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना आश्वासन दिले की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि चौकशीनंतर त्यांना शिक्षा केली जाईल.
पंतप्रधान ओली दुबईला जाण्याच्या तयारीत Nepal Protests ।
दरम्यान, पंतप्रधान ओली देखील त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित आहेत. निदर्शनांचा वाढता ताण पाहता ते उपचाराच्या बहाण्याने दुबईला जाण्याच्या तयारीत आहेत. यासाठी हिमालय एअरलाइन्सच्या विमानाचा पर्याय निवडण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे.
निदर्शकांनी मंत्र्यांचे घर पेटवले Nepal Protests ।
सोमवारी रात्री निदर्शकांनी माहिती मंत्री पृथ्वीसुब्बा गुरुंग आणि माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल यांच्या निवासस्थानांना आग लावली आणि तोडफोड केली. याशिवाय, जमाव माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्या घराकडेही सरकत होता.
सरकारकडून हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश
हिंसाचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, ज्याला १५ दिवसांत अहवाल सादर करायचा आहे. तथापि, सूत्रांचे म्हणणे आहे की ओली यांना शंका आहे की समिती लवकरच कोणताही ठोस निकाल देऊ शकेल. दरम्यान, संचारबंदी लागू असूनही, मंगळवारीही अनेक ठिकाणी निदर्शने सुरूच होती.





