Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे भाजपवर सडकून टीका केली होती. भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यांनी केलेल्या आरोपांनंतर राजकारण चांगले तापले होते. त्यानंतर अजित पवार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वार पलवावर सुरू झाले असून राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. या सगळ्या घडामोडींवर उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी गौप्यस्फोट करत मोठा दावा केला आहे. अजित पवारांना ब्लेकमेलिंक करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांना ब्लॅकमेल करून तुम्ही (भाजप) राष्ट्रवादी फोडली, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांना केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तुमचा धंदा ब्लॅकमेलिंगचा आहे. तुम्ही ग्रेट गॅमलर आणि ग्रेट ब्लॅकमेलर आहात, अशी घणाघाती टीका देखील संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. संजय राऊत नेमकं काय म्हणाले? सगळ्याच्या बाबातीत ब्लँकमेंलिंगचे राजकारण सुरूच आहे. ही फाईल उघडी आहे ती फाईल उघडी आहे. अजित पवार यांना ब्लॅकमेल करून तुम्ही राष्ट्रवादी फोडली. एकनाथ शिंदे आणि चाळीस लोंकाना तुम्ही ब्लॅकमेल करून फोडलं. अशोक चव्हाण यांना ब्लॅकमेल करून फोडलं. तुमचा धंदा ब्लॅकमेलिंगचा आहे, तुम्ही ग्रेट गॅमलर आणि ग्रेट ब्लॅकमेलर आहात आणि तेच दिसत आहे. भाजपचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या विधानावर भाष्य करताना इतिहासाची पाने उघडायला भाग पाडू नका असे विधान करून इशारा दिला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, बावनकुळे काय न्यायाधीश झाले आहेत का? की तपास अधिकारी? तुमचे वैचारिक मतभेत आहेत. बावनकुळे काय बडबडत आहेत. फडणवीस काय बोलतात आहेत. मग बसवा त्यांना समोर आणि द्या त्यांना सावकरांचे धडे अशा आक्रमक शैलीत राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. संजय राऊतांचा मोठा दावा पुढे बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर देखील टीकीचे बाण सोडले. एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांचा संबंध फक्त पैसा सत्ता आणि गुंडगिरीशी आहे. जोपर्यंत सत्ता तुमच्याकडे आहे, तोपर्यंत ते तुमच्याबरोबर राहतील, उद्या आमची सत्ता आली तर आमच्या दारात येऊन उभे राहतील, असा मोठा दावा देखील संजय राऊतांनी बोलताना केला आहे. हेही वाचा : Shefali Shah: शेफाली शाहचा खुलासा; पहिल्या लग्नात सहन केला भावनिक छळ, माजी पतीसोबतचं नातं होतं वेदनादायक