‘तुम्ही मातोश्रीवर नाक रगडायला अनेकदा आला’ संजय राऊत यांनी अमित शाह यांना दिलं उत्तर

Lok Sabha Election 2024 महाराष्ट्रात दोन नकली पक्ष आहेत. एक आहे नकली शिवसेना, दुसरी आहे नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धीमुर्धी काँग्रेस पार्टी. या तिघांची ऑटो आहे. मात्र यांचे काही खरे नाही, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लगावला. महाराष्ट्राचा विकास हे तीन पक्ष करू शकत नाहीत, हे काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात असा दावाही त्यांनी केला.
नांदेड लोकसभेचे महायुतीचे भाजपातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गुरुवारी अमित शहा यांनी जाहीर सभा घेती. यावेळी अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. या टीकेवर आज उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
‘अमित शाह यांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला नकली म्हणाले होते. पण मी सांगू इच्छितो की, असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही. तुमच्या हातात पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना हाताशी धरुन पक्ष खरा की खोटा ठरवणार असाल तर जनता ते सहन करणार नाही.’
ते पुढे म्हणाले,’याच नकली शिवसेनेचे प्रमुख तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे त्यांच्यासमोर नाक रगडायला तुम्ही मातोश्रीवर अनेकदा आला आहात. २०१९ ला मातोश्रीवर आलात तेव्हा हीच शिवसेना असली होती. आता खोटे गोटे गळ्यात अडकवून फिरत आहात, त्यांना असली म्हणत आहात. मात्र आता हे गोटेच तुमचा कपाळमोक्ष करतील. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हेच दोन खरे पक्ष आहेत. बाकी अमित शाह यांनी जे डुप्लिकेट पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवारांन दिले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही.
हे वाचले का ? भंडारा-गोंदियात हत्तीची चाल..! बसपाच्या तेली समाजाचा उमेदवाराने वाढले भाजप अन् काँग्रेसचे ‘टेन्शन’





