Sanjay Raut on Amit Shah । शिर्डीमध्ये काल भाजपाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार )अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून दिली” असे म्हणत टीका केली. त्यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे हे दगा फटका करून मुख्यमंत्री झाले असल्याचा गंभीर आरोप देखील केला. आता त्यांच्या याच आरोपांचा समाचार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. अमित शाह यांनी ‘उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा अपमान’ असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला. हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान अमित शाह यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मंडळी. यावेळी संजय राऊत यांनी,”उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांनी दगाफटका केलेला नाही. तर भाजपाने गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम अमित शाह आणि मोदींनी केलं आहे. आता तेच अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. या वाक्यावर टाळ्या वाजवल्या गेल्या हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचेही संजय राऊत यांनी यावेळी म्हटले. बाहेरचे लोक येऊन राज्यातल्या नेत्यांवर सडक्या शब्दांत टीका करतात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. याचाही खरपूस सामाचारसंजय राऊत यांनी घेतला. “शरद पवार यांनी अख्खी हयात राजकारण आणि समाजकारण यांच्यासह सार्वजनिक आयुष्यात घालवली. शरद पवार यांनी पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दांत टीका करणं हे महाराष्ट्रातल्या भाजपाच्या लोकांना पटलं आहे का? आवडलं आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे. कुणीतरी बाहेरचे लोक येतात, पदावर असणारे नेते असतील. पण ज्यांनी महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेचा आणि शरद पवारांचा अपमान करता आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, “परळीत जे काही घडलं आहे त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवत नाही तोपर्यंत हे सुरुच राहिल. काही पोराटोरांना त्यांनी मोक्का लावला आहे. ज्यांना मोक्का लावला आहे ते भाडोत्री आहेत. मुख्य आरोपी मोकाट आहेत. त्याच्यावर एक साधा गुन्हा टाकला आहे, त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्हाला इथली परिस्थिती माहीत नाही का? गुंडांच्या मदतीने सरकार चालवणं ही महाराष्ट्राशी गद्दारी आहे” असे उत्तर संजय राऊत यांनी दिले. इंडिया आघाडी बळकट झाली पाहिजे Sanjay Raut on Amit Shah । शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्याच सहकाऱ्यांना हे वाटतं आहे की इंडिया आघाडी आणखी बळकट झाली पाहिजे. देशासमोर जे संकट आणि समस्या आहे ती म्हणजे मोदी आणि शाह. संविधानावर हल्ले होत आहेत. हे संकट असताना इंडिया आघाडीने बळकटीने एक राहिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे असेही राऊत यांनी म्हटले. हेही वाचा Parli Accident: अपघात की घातपात? अखेर फरार झालेला टिप्पर चालक पोलिसांच्या ताब्यात