Parli Accident: अपघात की घातपात? अखेर फरार झालेला टिप्पर चालक पोलिसांच्या ताब्यात

Parli Accident Update | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महिन्याभरात पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरला आहे. राखेची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका सरपंचाला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अभिमन्यू क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव आहे. ते सौंदना गावचे सरपंच होते. मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पोलिसांनी या टिप्पर चालकाला ताब्यात घेतले असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
नेमकं काय घडलं होतं?
शनिवारी रात्री सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना मिरवट फाट्यावर राखेची वाहतूक करणा-या टिप्परने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात त्यांच्या डोक्याला भीषण दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर परळी पोलिसांनी टिप्पर चालक भोजराज देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून टिप्पर पोलीस ठाण्यात जमा केले. अखेर टिप्पर चालक पोलिसांच्या हाती लागला आहे. हा अपघात की घात? असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. Parli Accident Update |
सुरेश धस यांचे गंभीर आरोप
एकीकडे संतोष देशमुख प्रकरण गाजत असतानाच आणखी एका सरपंचाचा जीव घेल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केला आहे.
“परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेची अवैध वाहतूक आणि व्यवसाय होत आहेत. याच राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने सरपंच क्षीरसागर यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा घातपात होता का? याची चौकशी झाली पाहीजे. परळी विभागाची चर्चा महाराष्ट्रात सुरू असून सुद्धा राखेचे टिप्पर बंद नाही. या अवैध व्यवसायांना परळीचे पोलीस, औष्णिक विद्युत प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार आहेत,” असे सुरेश धस यांनी म्हंटले होते. Parli Accident Update |
हेही वाचा:
‘आई, वडील, बहीण कुटुंब नसतं का? नवराचं फक्त…”; हेमांशूवरून कमेंट करताच अमृताने दिले सडेतोड उत्तर





