Sanjay Raut : “जर हा पेड इव्हेंट असेल तर मग लाडकी बहीण योजना काय होती?”; संजय राऊतांचा फडणविसांना सवाल
Sanjay Raut : . भाजप हा काही पक्ष नाही तर हा एक पेड इव्हेंट - संजय राऊत

Sanjay Raut : पुण्यात काल ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमाच्या माध्यामातून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी ‘Gen Z’ यांच्यासोबत संवाद साधला. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात जेन झेड सोबत संवाद साधणार आहेत. यावरून त ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पुण्यात पार पडलेल्या तरुणांच्या मेळाव्याला सत्ताधाऱ्यांनी ‘पेड इव्हेंट’ असे संबोधले होते. त्यावर संजय राऊत यांनी, “काल जेन झीचा मेळावा पुण्यात झाला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हा पेड इव्हेंट असल्याचे म्हटलं होतं मग आज तुमचा काय आहे?” असा सवाल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “हा पेड इव्हेंट असल्याचे म्हणत तुम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांचाच अपमान करत आहात. जर हा पेड इव्हेंट असेल तर मग लाडकी बहीण योजना काय होती? लाडकी बहीण हा मत विकत घेण्यासाठी केलेला पेड इव्हेंटच होता. बिहारमध्ये मोदी यांनी दहा-दहा हजार दिले, हा सुद्धा पेड इव्हेंटच होता. स्वत: भारतीय जनता पक्षच एक पेड इव्हेंट आहे. भाजप हा काही पक्ष नाही, हा एक पेड इव्हेंट आहे.” Sanjay Raut
विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात निकृष्ट दर्जाचं भोजन
यावेळी संजय राऊत यांनी यावेळी आंबेगावच्या घटनेचा दाखला दिला. “महाराष्ट्रात सध्या एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे, त्यावर आपले मुख्यमंत्री फडणवीस काही बोलले आहेत का? शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात निकृष्ट दर्जाचं भोजन दिलं जात आहे. आंबेगावच्या एका शाळेमध्ये कच्चं धान्य, कच्चा वाटाणा आणि इतर सर्व हे कुकरच्या तेरा शिट्ट्या घेऊन सुद्धा शिजत नाही. Sanjay Raut
हे लोकांसमोर आणणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आलं. फडणवीसांनी हा वाटाणा घरी नेऊन वहिनीसाहेबांना शिजवायला सांगावा,” असा टोलाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला. तसेच हे धान्य पुरवणारे पुरवठादार सर्व नागपूरचे आहेत, पोषण आहाराचे कंत्राट नागपूरच्या भाजपधार्जिण्या ठेकेदारांना दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. Sanjay Raut
हेही वाचा:
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दादा भुसेंसोबत चार तास बैठक! अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश






