Sanjay Raut : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या कामात विलंब झाल्याबाबत उद्धव ठाकरेंच्या काळातील ‘वर्क फ्रॉम होम’ धोरणावर टीका केली होती. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील कामगिरीचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राचे आरोग्य आणि जनतेचे प्राण वाचवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. Sanjay Raut कोरोना महामारीच्या काळात माणसांचे जीव वाचवणे ही सर्वात मोठी जबाबदारी होती. कोणत्याही मुख्यमंत्र्यांसमोर यापूर्वी असे आव्हान कधी नव्हते. झाडे तोडणे किंवा रस्ते बांधणे हे काम कधीही करता येते, पण लाखो मराठी जनतेचे प्राण वाचवणे हे खरोखरच कठीण काम होते, असे राऊत म्हणाले. त्यांनी (Sanjay Raut) पुढे म्हटले की, कोविड काळात एकनाथ शिंदेंचा देखील जीव उद्धव ठाकरेंच्या सरकारमुळेच वाचला.संजय राऊत यांचे हे वक्तव्य शिंदेंच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासंबंधीच्या टीकेला थेट उत्तर म्हणून पाहिले जात आहे. राऊत यांनी विकासकामांपेक्षा मानवी जीवन वाचवण्याच्या कामाला अधिक महत्त्व दिले असल्याचे स्पष्ट केले.