Sanjay Raut : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये महाराष्ट्राला हादरून सोडणारी धक्कादायक घटना उघडकीस आली. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून तिची गोठ्यात हत्या केली. या धक्कादायक घटनेने नसरापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज नसरापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधमला अटक केली असून, त्याला न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नसरापूर प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी राज्य सरकावर जोरदार टीका केली आहे. चार वर्षांच्या मुलीवर नराधमाने अत्याचार केला. कायद्याचा धाक नसल्याने नराधम अत्याचार करू शकला, याला सर्वस्वी जबाबदार गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले आहे. या प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रातील माता आणि भगिनींनी सरकारविरोधात बंड केले पाहिजे, सराकारला जाब विचारायला पाहिजे, विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे, हे राज्य सामान्य माणासाला राहण्यालायक उरलेले नाही असे दुर्देवाने म्हणावसं वाटतंय, फक्त पैशांचा माज, पैशांची मस्ती आणि सत्ता या बळावर राज्य सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. चार वर्षांच्या मुलीवर नराधमाने अत्याचार केला. कायद्याचा धाक नसल्याने नराधम अत्याचार करू शकला. याला सर्वस्वी जबाबदार गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आहे. सरकाराने ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. कायद्याचा धाक सामान्य जनतेला दाखवता, ज्यांच्यावर लाठीचार्ज केला त्या जनतेचा काय दोष असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. ते त्या मुलीचा मृतदेह घेऊन रस्त्यावर उतरले कारण सरकार नालायक असल्याचे राऊत म्हणाले. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले खरं म्हणजे जनतेने सरकारला ताब्यात घेतले पाहिजे. आरोपी सरकार आहे. पोलिस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहेत, सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात असून सरकारवर खटला दाखला केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हेही वाचा : Salman Khan Bodyguard : ‘ते सलमानला गोळ्या झाडायला आले होते’; सलमान खानच्या बॅाडीगार्डचा धक्कादायक खुलासा, नेमकं प्रकरण काय?