Sanjay Raut: “बाळा, तू चुकीच्या पक्षात आहेस, ही मुंबई आहे…”; संजय राऊतांचा कृष्णराज महाडिकांना खोचक टोला
Sanjay Raut: माहीममध्ये झालेल्या राजकीय राड्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा मनसेवर गंभीर आरोप

Sanjay Raut: मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असताना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्यांच्या कक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो शेजारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता.
हा फोटो मनसे नेते अमित ठाकरे यांनी काढायला लावला. त्यानंतर यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. याविरोधात भाजपा युवा मोर्चाने माहीममध्ये आंदोलन केले.
भाजप युवा मोर्चाकडून मुंबईतील मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करण्याची मोहीम आखली होती. मात्र भाजपच्या या आंदोलनाआधीच मनसेचे नेते देखील शिवतीर्थाबाहेर पोहोचले. (Sanjay Raut)
त्यामुळे कृष्णराज महाडिक, भाजयुमोचे आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी मनसे आणि भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा पाहायला मिळाला.
यावरून कृष्णराज महाडिक यांनी मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. याच मुद्द्यावरून आता उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिकांवर पलटवार केला.
बाळा,
तू चुकीच्या पक्षात आहेस!
ही मुंबई आहे,
ती आजही शिवसेना,अस्सल मराठी माणूस आणि ठाकऱ्यांचीच आहे!
बाकी सगळे येतात आणि जातात!@KDMahadik https://t.co/rNkG4RRd90— Sanjay Raut (@rautsanjay61) September 2, 2026
खासदार संजय राऊत म्हणाले, “बाळा, तू चुकीच्या पक्षात आहेस! ही मुंबई आहे, ती आजही शिवसेना, अस्सल मराठी माणूस आणि ठाकऱ्यांचीच आहे! बाकी सगळे येतात आणि जातात!” सोबतच त्यांनी एक मीम देखील शेअर केले आहे. ज्यात भाजपा युवा मोर्चाला ‘खाजप युवा मोर्चा’ म्हणत टोला लगावण्यात आला आहे.
कृष्णराज महाडिक यांचा आरोप (Sanjay Raut)
दरम्यान, माहीममध्ये झालेल्या राजकीय राड्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी गंभीर आरोप केला होता. “आम्ही तिथे शांतपणे आंदोलन करण्यासाठी गेलो होतो परंतु तिथे मनसेच्या गुंडांनी आमच्या मुलांना मारले आहे. काचेची बॉटल फेकून त्यांना इजा व्हावी आणि हिंसक गोष्टी घडाव्यात या विचाराने ते तिथे जमले होते,” असे कृष्णराज महाडिक म्हणाले. या आरोपानंतर फोटोवरुन निर्माण झालेला वाद आणखी चिघळला.
हेही वाचा:






