Ram Mandir : “भाजप दोषींना पाठीशी घालत आहे” राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी काॅंग्रेसची टिका
Ram Mandir : सरकार जबाबदारी निश्चित करण्याऐवजी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप

Ram Mandir : रविवारी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित देणगी चोरीप्रकरणी दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.
तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. पंतप्रधान मोदींनी या विषयावर आपली मौन सोडावे. सरकार जबाबदारी निश्चित करण्याऐवजी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असे काॅंग्रेसने म्हटले आहे.
भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंधित व्यक्तींची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यावर काॅंग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या देखरेखीखाली ही कथित चोरी झाली असतानाही पंतप्रधानांनी सखोल चौकशीचे आदेश का दिले नाहीत? आरएसएस आणि राम मंदिर ट्रस्टच्या आकडेवारीचा संदर्भ देत, काॅंग्रेसने सांगितले की, २०२१ मधील निधी समर्पण अभियान आणि इतर देणग्यांच्या माध्यमातून ३,२६४ कोटी रुपये जमा झाले होते.
१ एप्रिल २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या काळात ८२.७८ कोटी रुपयांची देणगी जमा झाले. त्यावेळी अयोध्येत करोडो भाविकांनी भेट दिली होती. २०२४ च्या पहिल्या नऊ महिन्यांत १३.५५ कोटी भाविकांनी अयोध्येला भेट दिली होती, तर २०२५ मधील महाकुंभ दरम्यान सुमारे १० कोटी भाविक तिथे आले होते.
हा सगळा पैसा नक्की कुठे गेला ते मुख्यमंत्री योगी अधित्यनाथ यांनी सांगावे असे काॅंग्रेसचे म्हणणे आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा आरोप करण्यात आला आहे.





