Sanjay Raut : “…त्यानंतर पुढच्या १० दिवसांमध्ये अजित पवारांचा मृत्यू”; भाजपच्या फाईलचा उल्लेख करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut : आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे - संजय राऊत

Sanjay Raut : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहे.
अनेकांकडून अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत पुढे म्हणाले की, “माझ्याकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल आहे, असे अजित पवार हे वारंवार सांगत होते. मी त्या फाईल उघड करीन असे त्यांनी १५ जानेवारी रोजी सांगितले होते. त्यानंतर पुढच्या १० दिवसांमध्ये अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. हे रहस्यमय आहे.
मला या प्रकरणात जस्टिस लोया यांची आठवण आली. मी कोणावर आरोप करत नाही, पण या लोकांच्या मनातल्या शंका आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. ते मी वाचले असून ते गंभीर स्वरूपाचे आहेत.” Sanjay Raut
पुढे संजय राऊत म्हणाले, “अजित पवार यांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव होता. तो देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय ठरला असता. तसेच भारतीय जनता पक्षाची दहशत मोडून गेली असती. अजित पवार यांनी कधीही भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केलं नाही. भाजपाने त्यांच्यावर काही संकटं लादली.
घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी-सीबीआय मागे लावले. त्यामुळे इतर राजकारणी करतात, तेच त्यांनी केलं आणि तेवढ्यापुरते ते भाजपाला सरेंडर झाले. आपल्यावरच्या फायली शहाणपणाने क्लियर करून घेतल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ प्रवाहात येण्याची धडपड सुरू केली. ती करत असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर कधीही काम केलं नाही. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.”
संजय राऊतांचा CM फडणवीसांना टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अजित पवार यांच्या मनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा विचार असेल तर त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली असती,’ असे म्हंटले. त्यावरून संजय राऊत यांनी, अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली नाही म्हणजे त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल, असा टोला लगावला.
अजित पवार हे स्वत:च्या मर्जीने भाजपासोबत गेले होते. मात्र त्यानंतर भाजपा हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही, असे त्यांना वाटले असावे. अजित पवार यांना स्वगृही जायचं असेल तर त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरजच काय होती, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
हेही वाचा:
Tamanna Bhatia: तमन्ना भाटियाचा मुंबईत ज्वेलरी स्टोअरचा भव्य शुभारंभ






