Rohit Pawar : “अजित पवारांच्या तेराव्याचा धार्मिक विधी झाल्यानंतर सगळं सांगणार,” रोहित पवारांचा इशारा
Rohit Pawar : अजित पवारांकडून विलिनीकरणाची चर्चा सुरू असती, तर त्यांनी मला सांगितले असते - मुख्यमंत्री फडणवीस

Rohit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पक्षाच्या गटनेतेपदी आणि उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी वेग धरला आहे.
शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अजित पवारांची इच्छा असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडून विलिनीकरणाची चर्चा सुरू होती तर त्यांनी मला निश्चित सांगितले असते, असे म्हणत चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे सूचित केले.
यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचा तेराव्याचा विधी झाला की सगळं सांगतो, असा इशारा दिला. Rohit Pawar :
काय म्हणाले रोहित पवार ?
“विलिनीकरणाच्या अनुषंगाने काही दावे प्रतिदावे सुरू आहेत. मी पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात भाष्य करणार आहे. आता राजकीय बोलणे योग्य होणार नाही. पवार घराण्यात सध्या दु:खाचे वातावरण आहे.
एकदा अजित पवार यांच्या तेराव्याचा धार्मिक विधी होऊ द्या. विलिनीकरणाच्या बाबतीत दादांसोबत काय चर्चा झाली, या सगळ्या प्रक्रियेत मी होतो, मात्र तेरा दिवसांनी सांगेल,” असे रोहित पवार म्हणाले. Rohit Pawar :
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी घाई झाली का, असे विचारले असता रोहित पवार म्हणाले, “त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांचे पक्षाचे प्रमुख लोक प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे त्या अनुषंगाने चर्चा करीत होते.
मुख्यमंत्री यांच्याशी बोलत होते. त्यानंतर त्यांची सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाली आणि शपथविधीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोहित पवार यांनी म्हंटले. Rohit Pawar :
हेही वाचा:






